Saturday, May 17, 2025
क्राइमगोंदिया

सडक अर्जुनीचे नगराध्यक्ष मडावी,प्र.मुख्याधिकारी शरद हलमारे,नगरसेवक व इतर लाच प्रकरणी ACB च्या जाळ्यात

गोंदिया : सडक अर्जुनी नगर पंचायतीतील यंत्रणेचा लाचखोरपणा समोर आला आहे. दिनांक १४ मे रोजी सडक अर्जुनी नगर पंचायतमध्ये केलेल्या सापळा कारवाईत

लाच मागणारे

आरोपी  ईतर लोकसेवक :-
   १) तेजराम किसन मडावी वय ६६ वर्ष नगराध्यक्ष, नगर पंचायत, सडक अर्जुनी, रा. सडक अर्जुनी जि. गोंदिया
२) 
श्री  शरद  विठ्ठल हलमारे  वय ५६ वर्ष धंदा नोकरी , नायब तहसीलदार, तहसील कार्यालय,सडक अर्जुनी, अतिरिक्त पदभार मुख्याधिकारी ,नगर पंचायत,सडक अर्जुनी ( वर्ग२) रा. सेंदुर वाफा,ता.साकोली जि. भंडारा
३) 
अश्लेश मनोहर अंबादे वय ३५ वर्ष, सभापती बांधकाम समीती, न. प. सडक अर्जुनी रा. सडक अर्जुनी जि. गोंदिया
४) 
महेंद्र जयपाल वंजारी वय ३४ वर्ष नगरसेवक न. प. सडक अर्जुनी रा. सडक अर्जुनी जि. गोंदिया
५)  खाजगी ईसम जुबेर अलीम शेख @ राजू शेख
(नगर सेविका हीचा पती) रा. प्रभाग क्रं ४,सडक अर्जुनी. जि. गोंदिया
६) खाजगी ईसम
शुभम रामकृष्ण येरणे वय २७ वर्ष धंदा व्यापार. रा.सडक अर्जुनी जि. गोंदिया. ह्या सहा जणांना जाळ्यात अडकविले आहे.

हे सर्व आरोपी एका कंत्राटदाराकडून कार्यारंभाचे आदेश देण्यासाठी १ लाख ८३ हजार रुपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे.

सविस्तर असे की, सडक अर्जुनी नगर पंचायतच्या वैशिष्टपुर्ण अनुदानातील लेखाशिर्षका अंतर्गत तक्रारकर्ता
कंत्राटदाराला दोन नाली बांधकामाच्या निविदा मंजुर झाल्या. बांधकामाच्या नियमानुसार तक्रारकर्त्याने सर्व निकषाची पुर्तता केली. दरम्यान कार्यारंभाच्या
आदेशासाठी प्रयत्न सुरू केले.

मात्र नगराध्यक्ष तेजराम मडावी यांनी निविदा रक्कमेचा १५ टक्के लाच मागितली. त्याच बरोबर प्रभारी मुख्याधिकारी शरद हलमारे यांच्या सोबत भेट करून घेण्याचा सल्लाही
दिला. दरम्यान पंचासमक्ष नगराध्यक्षाने सुचविलेल्या १ लाख ८२ हजार रुपये लाच रकमेची मागणी केली. या मागणीला बांधकाम सभापती अश्लेश मनोहर अंबादे,
नगरसेवक महेंद्र जैपाल वंजारी, नगरसेविकेचा पती
जुबेर अलीम शेख (राजु शेख) तथा शुभम
येरणे यांनी देखील लाच मागण्यास प्रत्सोहन
केले. या प्रमाणे तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरून आणि प्रकरणाची सहनिशा झाल्यानंतर लाच देण्याचे ठरले. यानुरूप दिनांक १४ मे रोजी लाचलुचपत विभागाने
सापळा रचला. दरम्यान खाजगी व्यक्ती
शुभम रामकृष्ण येरणे याने मुख्याधिकारी शरद हलमारे
नगराध्यक्ष तेजराम मडावी, बांधकाम सभापती अशलेश मनोहर अंबादे, नगरसेविक महेंद्र वंजारी, नगरसेविकेचा पती यांच्या सुचने प्रमाणे लाच स्विकारली. यावरून सर्व ६ आरोपींविरुद्ध डुग्गीपार पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक माकणीकर, अप्पर पोलिस
अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात उपअधिक्षक विलास काळे,पोनि अतुल तवाडे, उमाकांत उगले, सफौ.चंद्रकांत करपे, संजय बोहरे, मंगेश
कहालकर, संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, कैलाश काटकर, संगिता पटले, दीपक बाटबर्वे यांनी केली.


गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील नंबरशी  संपर्क साधावा.
1) मा.श्री.राहुल माकणीकर सर, पोलिस अधीक्षक ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र, नागपूर.मो.नं.9923252100.        
2) विलास काळे
पोलीस उप अधीक्षक,
ला. प्र.वि .गोंदिया
मो. नं.9867112185
अतुल तवाडे पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. गोंदिया
मो. क्र.9370997485
पो. नि. उमाकांत उगले
9664959090
ला. प्र. वि. गोंदिया
दुरध्वनी   07182251203
*@ टोल फ्रि क्रं. 1064

error: Content is protected !!