अर्जुनी मोरगाव भाजपाचा बालेकिल्ला, दावा सोडणार नाही : राजकुमार बडोले
गोंदिया- लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.त्यामुळे निवडणुकीपूर्वी पक्षाचे नेते त्यांच्या संभाव्य उमेदवारांचे अगोदरच संकेत देतात. अनपेक्षितपणे मला सांगण्यात आले की, तुम्हाला भाजपाकडून निवडणूक लढवावी लागेल. अर्जुनी मोरगावची जागा ही महायुती मध्ये भाजपाच्या अस्तित्वाची लढाई आहे. अर्जुनी मोरगाव हा भाजपाचा बालेकिल्ला असल्याने आपला आमदार निवडून आलातरच आपले अस्तित्व टिकेल, हे भाजपा नेत्यांनाही ठावुक आहे.
त्यामुळे पक्ष आपला दावा सोडनार नाही, असे माजी सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पत्रकारांशी औपचारिक चर्चा करताना सांगितले. मला २०२४ मध्ये विधानसभा निवडणूक लढवायची आहे. युती होणार की नाही हा नंतरचा विषय आहे. २०१४ च्या युती सरकारच्या काळात राज्याचा सामाजिक न्याय मंत्री असताना केलेल्या कामांमुळेच आजही लोक मला ओळखतात. या कार्यकाळात मुंबईत इंदू मिल मध्ये काम झाले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडन मध्ये घर विकत घेतले. दरवर्षी २०० विद्यार्थी आयएएस साठी पाठवायचे या सर्वगोष्टी समाजाच्या मनात रुजल्या आहेत .
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जाती व नव्या मतदारांची सहानुभूती ही भाजपाला आहे. असे असले तरी अशा अनेक क्षेत्रांत स्वतःला मजबूत समजणारे नेते आहे आणि ते निवडणूक लढवणार आहे.त्यामुळे यंदाची लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे. त्यातही मार्ग सोपा होईल. क्षेत्रात भाजपाची ४१ टक्के व्होट बँक आहे. ती कोणीही तोडू शकत नाही आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला त्याहूनही जास्त मते मिळाली आहे. आज ग्रामीण भागातील मतदारांमध्ये जागरूकता आहे. हे त्यांच्या वागण्या बोलण्यातून जाणवते.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यघटना, संविधानबदलाचे खोटे आख्यान ठरवले होते. काँग्रेस पक्षाच्या वतीने ८५०० रुपये खटाखट देणाऱ्यापत्रिका वाटण्यात आल्या.आम्हाला अजूनही लोक (मतदार)विचारतात पैसे कधी मिळतील,अशाप्रकारे काँग्रेसने आपल्याच मतदारांची दिशाभूल केली आहे.परंतु, पुन्हा पुन्हा भूलथापांना बळी पडणार नाही, याची जाणीव ग्रामीण भागातील लोकांनाही झाली असल्याचेही बडोले यांनी सांगितले.