Monday, May 12, 2025
क्राइमगोंदियादेवरी

ट्रकने दिली पोलिसांच्या गाडीला धडक,भीषण अपघात,1 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी, 2 किरकोळ जखमी

uppdet news…

गोंदिया – 3/7/2024- गोंदियाच्या देवरी पोलीस स्टेशन हद्दीतील मासुलकसा घाट येथे महामार्ग पोलिसांच्या गाडीचा अपघात.. एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असता उपचार दरम्यान त्या कर्मचाऱ्याचे मृत्यू ..तर दोन जण किरकोळ जखमी… भरधाव ट्रकने पोलीस गाडीला धडक दिल्याने घडला अपघात.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील देवरी पोलीस स्टेशन हद्दीतील मासुलकसा घाट येथे एका ट्रकने महामार्ग पोलिसांच्या गाडीला धडक दिल्याने एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असता त्या कर्मचाऱ्याचे उपचार दरम्यान मृत्यू झाल्याचे माहिती मिळाली. तर अन्य दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. मनीष बहेलिया असे मृत्यू झालेल्या  पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ट्रकची धडक इतकी भीषण होती की पोलीस गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती देवरी पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद झाली असता पुढील तपास पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!