Monday, May 12, 2025
अर्जुनी मोरदुर्घटना

मोरगाव टी पॉइंट वर दुचाकीस्वाराचा मृत्यू, लाडकी बहिण योजने साठी कागदपत्रे जमवणे बेतले जीवावर

सध्या राज्यभरामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेकरिता कागदपत्रांची जुळवा-जुळव सुरू आहे. याच आवश्यक कागदपत्रांकरिता ग्रामीण भागातील नागरिक तालुकास्तरावर येत असतात.

अर्जुनी मोरगाव –  राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे, महिला भगिनींनी कागदपत्रे जुळवण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे. महिलांसाठी घरातील कर्ते पुरुषही शासनाच्या या योजनेचा लाभ घरातील महिलांना मिळावा म्हणून प्रशासनाच्या कार्यालयात खेटे मारत आहेत. मात्र, या योजनेच्या लाभासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव एका 43 वर्षीय व्यक्तीसाठी जीवघेणी ठरली आहे. गावातून तालुक्याच्या ठिकाणी जाताना झालेल्या अपघातात  एकाचा मृत्यू झाला आहे. 

सध्या राज्यभरामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेकरिता कागदपत्रांची जुळवा-जुळव सुरू आहे. याच आवश्यक कागदपत्रांकरिता ग्रामीण भागातील नागरिक तालुकास्तरावर येत असतात. अशातच लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी जाणाऱ्या एका 43 वर्षीय दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 3 जुलै ला मोरगाव टि-पॉइंट येथील हिमालय बारजवळ घडली. घटना दुपारची 2 दरम्यानची आहे… नवीन BNS कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे…

शिवलाल लाडे (43) हे त्यांच्या पत्नीला निलज या गावातून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची कागदपत्रे घेण्यासाठी तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे घेऊन गेले होते. मात्र, शिवलाल यांचेकडून घरी एक कागदपत्रं विसरल्याने ते राहिलेले कागदपत्र घेऊन अर्जुनी मोरगावकडे परत जात असताना अपघाताची भीषण घटना घडली. मोरगाव टि-पॉइंट येथे हिमालय बारसमोर वडसाहून कोहमाराकडे जाणाऱ्या एका ट्रकने शिवलाल यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये, दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. जखमी शिवलाल ला ग्रामीण रुग्णालयात अर्जुनी मोरगाव येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, मोरगाव अर्जुनी पोलिसांनी या गुन्हा नोंद केला असून पुढील तपास करीत आहेत.

error: Content is protected !!