Tuesday, May 13, 2025
सड़क अर्जुनी

वंचित शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदानाचा लाभ माजी मंत्री बडोले यांचा पाठपुरावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले निर्देश

माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केला पाठपुरावा

सडक अर्जुनी – महात्मा ज्योतिबा फुले प्रोत्साहन राशी ( 50 हजार रुपये पर्यंत कर्जमाफी ) योजनेचा लाभ गोंदिया जिल्ह्यातील वंचित शेतकऱ्यांना त्वरित मिळण्यासाठी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे सतत पत्र व्यवहार व प्रत्येक्ष भेटुन व सवीस्तर चर्चा करुन ही मागणी रेटून धरल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ जुलै च्या पत्रानव्हे सहकार विभागाला या अनुदानाविषयी निर्देश दिले आहेत.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ देण्यासाठी सन 2017 -18 सन 2018- 19 आणि सन 2019- 20 या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले प्रोत्साहन राशी कर्जमाफी योजना सुरू करण्यात आली होती. सदर योजनेचा बऱ्याच शेतकऱ्यांना अजून पर्यंत लाभ मिळाला नाही. त्यामध्ये आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाराभाटी, ईडदा, नवेगाव बांध, पांढरवाणी येथील एक हजाराचे जवळपास शेतकऱ्यांना अजून पर्यंत प्रोत्साहन राशीचा लाभ मिळालेला नाही नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या उर्वरित शेतकऱ्यांना महात्मा फुले प्रोत्साहन राशी योजनेचा लाभ मिळावा म्हणून माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी संबंधित विभागांकडे सतत पाठपुरवठा केला. याबाबत बडोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन तथा प्रत्यक्ष भेटून सविस्तर चर्चा केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच दखल घेऊन पत्र क्रमांक 7132962, दिनांक 8 जुलै अन्वये सहकार विभागाला निर्देश देऊन हा प्रश्न त्वरित मार्गी लावून प्रोत्साहन राशी त्वरित देण्याचे निर्देश दिले आहे. माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे पाठपुराव्यामुळे आता लवकरच वंचित शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना  मिळणार आहे.

error: Content is protected !!