अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात 40 तलाठी कार्यालयाचे होणार बांधकाम आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या पाठपुराव्याला यश
सडक अर्जुनी – अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघात अर्जुनी मोरगाव सडक अर्जुनी व गोरेगाव तालुक्यांचा समावेश आहे. तलाठ्यांना मुख्यालयाची कार्यालयीन कामे करताना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत असे. तलाठी कार्यालय नसल्यामुळे पर्यायाने शेतकऱ्यांना व जनतेला त्रास सहन करावा लागत असे. या समस्ये कडे लक्ष देऊन अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना लेखी पत्र लिहून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील गावांमध्ये तलाठी कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालय बांधकाम करण्याकरिता पाठपुरावा केला.
या बाबीची दखल घेत राज्य शासनाने अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील 40 साजा चे ठिकाणी तलाठी कार्यालय बांधकामाची मंजुरी प्रदान केली. शेतकऱ्यांना वारंवार उत्पन्नाचा दाखला असो की अन्य कुठल्याही प्रकारचे दाखले प्राप्त करून घेण्यासाठी तलाठी कार्यालयाकडे धाव घ्यावी लागत होती. मात्र बऱ्याच ठिकाणी तलाठी कार्यालयाची इमारत नसल्याने शेतकरी व जनतेला त्रास सहन करावा लागत होता. या समस्येकडे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी लक्ष केंद्रित करून अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघातील अर्जुनी मोरगाव तालुक्या अंतर्गत उपलब्ध असलेल्या तलाठी साजा वर 19 , सडक अर्जुनी तालुक्यात 11 तर गोरेगाव तालुक्यात 10 गावांमध्ये तलाठी कार्यालय बांधकाम करण्यासाठी शासनाची मंजुरी घेऊन निधी उपलब्ध करून दिला आहे.
त्या ठिकाणी लवकरच तलाठी कार्यालयाचे बांधकाम सुद्धा होणार आहे. यामधे प्रामुख्याने सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी, गिरोला, राजगुडा ,सौंदड पांढरी, शेंडा, बोपाबॉडी , कोहमारा, घटेगाव , पळसगाव,,जांभळी तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी, शिरेगावबांध, पिंपळगाव, शिलेझरी ,अर्जुनी, धाबेटेकडी,केशोरी, कनेरी, परसटोल, गोठणगाव , खमकुर्रा, भिवखिडकी ,सावरटोला, ई टखेडा ,माहूरकुडा ,कोरंभी टोला, वडेगाव रेल्वे ,महागाव ,भर्नोली, तसेच गोरेगाव तालुक्यातील तुमसर , गिधाडी, मोहाडी, चोपा , कमरगाव, तिल्ली, निंबा ,बबई, चिल्लाटी याप्रमाणे एकूण 40 गावांमध्ये तलाठी कार्यालय इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी त्यांचे आ.चंद्रिकापुरे यांचे अभिनंदन केले आहे.