Tuesday, May 13, 2025
सड़क अर्जुनी

जि.प.केंद्र प्राथमिक शाळेच्यां वर्गात साचले पाऊसाचे पाणी, मुलांची होतेय गैरसोय,

सडक अर्जुनी – (डॉ. सुशिल लाडे ) २०-७-२४ -सडक अर्जुनी येथील जी. प. केंद्र प्राथमिक शाळेत चक्क पावसाचे पाणी जात असून मुलांची गैर सोय होत आहे. हा प्रकार बघून विद्यार्थी मुलांचे पालक संताप व्यक्त करीत आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील जी. प.प्राथमिक केंद्र शाळेत एक ते चार वर्ग आहेत.  जिल्हा परिषद शाळेत शाळा उघडण्याच्या वेळेस वरील दोन्ही वर्गात पावसाचे पाणी शिरल्याने गावकऱ्यांसह शालेय व्यवस्थापन समितीने संताप व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात झालेल्या पावसाने सडक अर्जुनी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन वर्गात पावसाचे पाणी शिरल्याने शनिवारी दिनांक २० जुलै रोजी सकाळी शाळा सुरू होण्याच्या वेळेस हा प्रकार उघडकीस आला आहे. शाळा उघडल्या नंतर पालक मुलांना वर्गात सोडले असता पालकांना शाळेच्या वर्ग खोलीत पाणी साचला असताना दिसले.

शालेय मुलांना या हद्दल विचारणा केली असता मुले म्हणाली आता आम्हाला वॉशिंग मशिंग सुरू करावी लागेल . आणि मुलांनी आपली वॉशिंग मशिन सुरू केली. बघतो तर काय की, एक मुलगा गुंडाळलेला पोती वर बसतो तर दुसरा मुलगा त्याला ओढत जातो. आणि अशा प्रकारे मुले मेक इंडिया ,डिजिटल इंडिया च्या द्वारे वर्गातील पाणी वर्गा बाहेर काढत जातात.

प्राप्त माहितीनुसार सांगायचे म्हणजे काही महिन्यांपूर्वीच शाळेच्या इमारत दुरुस्ती करिता नि.पा.यो. द्वारा सन 2023 / 24 लां अंदाजे चार लक्ष रुपयाचे काम केले गेले असल्याचे फलक शाळेत लावल्या गेले असून ते काम 15/3/2024 ला पूर्ण झाले आहे.

वर्गात पाणी शिरल्याचे मुलांची चांगलीच गैर सोय होत असून शाळा समितीचे अध्यक्ष संजय प्रधान आणि पालक वर्ग यांनी यावर उपाय योजना करण्यात यावी अशी संबंधित विभागाला विनंती केली आहे.

error: Content is protected !!