लोहिया विद्यालयात गुरुपौर्णिमा कार्यक्रम साजरा
सौंदड- येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय तसेच जमुनादेवी लोहिया प्राथ .शाळा सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात रविवार दि.२१ जुलै २०२४ ला व्यास पूजा (गुरुपौर्णिमा) कार्यक्रम सकाळी ८.१५ वाजता मा. जगदीश लोहिया, संस्थापक – संस्थाध्यक्ष लो-शि-संस्था, सौंदड यांच्या अध्यक्षतेखाली, मा.आ.न. घाटबांधे, उपाध्यक्ष लो-शि. संस्था, मा. पंकज लोहिया सचिव लोहिया शिक्षण संस्था, सौंदड मा. मधुसूदन अग्रवाल, सहसचिव, लो-शि-संस्था, मा. वर्षाताई शहारे ,सदस्या पं.स.स/अर्जुनी, मा-गायत्रीताई इरले, माजी सरपंच, सौंदड, मा. रुपालीताई टेंभुर्णे, माजी जि.प.सदस्या, मा.लताताई गहाणे, सरपंच फुटाळा, मा-अनिल मेश्राम, से. नि.प्राचार्य, मा. नलिराम चांदेवार, मा.गुलाब शहारे, मा.पुरुषोत्तम भिवगडे, मा.डॉ. मारगाये, मा. पुरुषोत्तम लांजेवार मा.प्रल्हाद कोरे ,मा.बाबुराव हरणे,मा. उमा आर .बाच्छल प्राचार्या , मा. गुलाबचंद चिखलोंढे प्राचार्य, मा. मनोज शिंदे मुख्याध्यापक,मा. डी एस .टेंभुर्णे पर्यवेक्षक , मा.आर. एन अग्रवाल प्राध्यापक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला,
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथीनी भगवान ओम, भगवान गणेश व माता सरस्वतींच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. जगदीश लोहिया संस्थापक संस्थाध्यक्ष लोहिया शिक्षण संस्था सौंदड यांनी ” विद्यार्थ्यांनो गुरू पासून प्रेरणा घेवून आपले मानव जीवन सार्थकी बनवा तसेच वारकरी संप्रदायापासून प्रेरणा घेवून सर्व जातींना सामावून घेणाऱ्या वारकरी संप्रदायासारखे मानवतावादी बना” असे गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सर्वांना गुरुपौर्णिमा (व्यासपुजा) च्या शुभेच्छा दिल्या तसेच विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना रुद्राक्ष माळ भेट दिली.प्रमुख अतिथी तसेच विद्यालयातील शिक्षकांनी सुद्धा आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सुद्धा गीतातून व भाषणातून गुरुपौर्णिमेचे महत्व पटवून दिले.
कार्यक्रमाला लोहिया शिक्षण संस्थेच्या विविध कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्यगण ,निमंत्रित पाहुणे, पालक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन स.शिक्षिका कु. यु. बी. डोये यांनी केले तर आभार पर्यवेक्षक श्री डी. एस. टेंभूर्णे यांनी मानले.