एरिया 51 कोहमारा येथे उपमुख्यमंत्रीअजित दादा पवार यांचा वाढदिवस साजरा
सडक अर्जुनी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालय एरिया 51 कोहमारा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा वाढदिवस आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी अजित दादांना आता मुख्यमंत्री बनवायचे असून एकच वादा अजित दादा असा संकल्प आपण सर्वांनी करून पुन्हा राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापनेसाठी आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. यासाठी कमीत कमी वेळात अधिक मेहनत घेऊन येणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज असले पाहिजे असे विचार व्यक्त केले.
तसेच इतर मान्यवरांनी देखील उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या राजकीय जीवन कार्यावर प्रकाश टाकला.यावेळी वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ.अविनाश कशिवार, नगराध्यक्ष तेजराम मडावी उपाध्यक्ष वंदना डोंगरवार ,महिला अध्यक्ष रजनी गिरहेपुंजे, पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाने, डॉ. सुगत चंद्रिकापुरे, न.प.सभापती दीक्षाताई भगत, सभापती असलेश अंबादे, नगरसेवक देवचंद तरोने,कामिनी कोवे, अंकित भेंडारकर ,महेंद्र वंजारी, गोपीचंद खेडकर, पोलीस पाटील संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका युवा अध्यक्ष राहुल यावलकर, ईश्वर कोरे, सुभाष कापगते, शुभांगी वाढवे, माजी सरपंच पुष्पमाला बडोले, अनिता बांबोर्डे, हेमराज खोटेले, मुन्ना देशपांडे ,सचिन येसनसुरे, भागवत झिंगरे ,उमराव मांढरे, ओमराज दखणे, आस्तिक परशुरामकर, भोला कापगते,गजानन परशुराम कर, कृष्णा ठलाल, भैय्यालाल पूस्तोडे, माधव हटवार,पदिप पारधी,युवराज लांजेवार, चंद्रकुमार बहेकार,प्रमोद लांजेवार, मधु हर्षे,महेश शेंडे ,रमेश इडपाते,नाजूक झिंगरे,संध्या श्रीरंगे, करुणा गेडाम, संजीव शहारे, सचिन झिंगरे,रमेश बडोले, मुनेश्वर कापगते, शिवकुमार कापगते, तेजराम चुटे, परमानंद कोवे, देवराम ठाकरे, लालचंद मोटघरे,भीमराव वाघमारे,गणपत चौधरी, यांचेसह इतर पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.