1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन • विविध उपक्रमांनी साजरा होणार महसूल सप्ताह
गोंदिया, दि.26 : महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध सेवा आणि राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. महसूल विभाग हा राज्य शासनाचा अत्यंत महत्वपूर्ण विभाग आहे. या विभागाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना घेता यावा, नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दलचा नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम या सप्ताहादरम्यान राबविण्यात येणार आहेत. महसूल दिनापासून सुरु होणाऱ्या महसूल सप्ताहामध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
यामध्ये 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या दिवशी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन. 2 ऑगस्टला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, 3 ऑगस्टला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, 4 ऑगस्टला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय अभियान, 5 ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी, 6 ऑगस्टला एक हात मदतीचा- दिव्यांगांच्या कल्याणाचा व 7 ऑगस्टला महसूल संवर्गातील उत्कृट अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार व समारोप असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.