माजी आमदार रमेश कुथे यांनी बांधले शिवबंधन
गोंदिया – : भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या राजीनामा दिल्यानंतर माजी आमदार रमेश कुथे हे काँग्रेसमध्ये सामील होण्याचा कयास लावण्यात आली होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यांनी त्यांच्या स्वघरी भेट घेतल्याने रमेश कुथे यांची काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश होण्याची चर्चा रंगली होती.
मात्र आता माजी आमदार असलेले रमेश कुथे हे उद्धव ठाकरे गटात सामिल झाले आहेत. त्यांनी 26 जुलै रोजी मुंबईत जाऊन शिवबंधन बांधले आहे. रमेश कुथे यांच्या पक्ष प्रवेशने शिवसेनेला आणखी बळ मिळणार आहे. तर भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे.