उद्योगासाठी जिद्द व चिकाटी असणे गरजेचे -आ.मनोहर चंद्रिकापुरे
सडक अर्जुनी – आपण कुठलाहीउद्योग करताना त्याकडे सातत्याने लक्ष देणे आवश्यक आहे. तरच त्यामध्ये आपल्याला सहज रित्या यश प्राप्त करून घेता येऊ शकतो. अगरबत्तीच्या उद्योग हा न संपणारा उद्योग आहे. अगरबत्ती ला परदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे या उद्योगातून रोजगाराची संधी निश्चितच आपल्याला प्राप्त करून घेता येईल. परंतु त्यासाठी आपल्या मनात जिद्द व चिकाटी असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र राज्य औद्योगिक क्लस्टर विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत सामूहिक विकास केंद्र प्रकल्प इमारत भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी कोहमारा येथे उपस्थित महिला व नागरिकांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
पुढे ते ते म्हणाले या परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांच्या हाताला काम उपलब्ध व्हावा या उद्देशाने या प्रकल्पाची आपण सुरुवात केली . काही कारणामुळे प्रकल्प मागे पडला होता. मात्र आता आपल्या सर्वांच्या सहकार्याने निश्चितच प्रकल्पाला गती मिळणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेकांच्या हाताला काम मिळेल व त्या माध्यमातून रोजगाराची संधी सुद्धा या परिसरातील नागरिकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या उद्योगाकडे आपण निश्चितच सर्वांनी लक्ष केंद्रित करावे असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उद्योग केंद्र गोंदिया चे व्यवस्थापक सारंग पटले, गोस्वामी सर ,सडक अर्जुनी चे नगराध्यक्ष तेजराम मडावी प्रकाश चंद्रिकापुरे, मंजु ताई चंद्रिकापुरे, न. प . उपाध्यक्ष वंदना डोंगरवार यांच्यासह नगरपंचायत चे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रामुख्याने महेंद्र चंद्रिकापुरे, प्रशांत डोंगरे, मनोज तागडे, गौतम गणवीर, सरिता शहारे, आरती वालदे ,लता सूर्यवंशी, अंजु राऊत ,वर्षा उके, संध्या चंद्रिकापुरे, नंदा गहाणे, दीक्षा भोवते, इंदिरा जनबंधू, शुद्धलेखा मेश्राम, ज्ञानेश्वरी शेलारे, वनिता बडोले, महानंदा जनबंधू, हिना राऊत, समीना राऊत ,काजल बडोले, पदमा कोटांगले ,सरिता राऊत, यांचे सह महिला व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.