डॉ.अजय लांजेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घरकुलांचे पट्टे वाटप
अर्जुनी मोरगाव – गोंदिया जिल्हा अर्जुनी/ मोर. तालुक्यातील अरुणनगर , गौरनगर बंगाली कॅम्प (वसाहत) येथे ग्रामपंचायत कार्यालय मध्ये उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अर्जुनी मोर यांच्याकडून डॉक्टर अजय लांजेवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घरांचे पट्टे सनद वाटपाचे कार्यक्रम संपन्न झाले.
1971 पासून असलेल्या बंगाली कॅम्प (वसाहत) अरुण नगर व गौरनगर येथील पुनर्विस्थापित नागरिकांना घराचे पट्टे अजून पर्यंत मिळाले नव्हते डॉक्टर अजय लांजेवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी यांनी अनेक दिवसापासून शासनाकडे येथील नागरिकांच्या समस्या व घराचे पट्टे मिळावे म्हणून पाठपुरावा केला .त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
अनेक दिवसापासून बंगाली कॅम्प येथील पुनर्विस्तापित नागरिकांना घराचे पट्टे मिळण्याचे समस्या याकडे शासनाने लक्ष देऊन दिनांक ८/८/०२४ ला ग्रामपंचायत मध्ये घराची पट्ट्यांच्या वाटप करण्यात आले. सर्व नागरिकांनी डॉक्टर अजय लांजेवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी यांचे आभार मानले. याप्रसंगी तालुका अध्यक्ष किशोर सहारे परिवहन विभाग, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.