Tuesday, May 13, 2025
सड़क अर्जुनी

सडक अर्जुनी येथे प.पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर द्वारे चर्चा बैठक कार्यक्रम संपन्न 

सडक अर्जुनी – निलेश शहारे – परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर द्वारे चर्चा बैठक कार्यक्रम आज दिनांक 11 आगष्ट रोजी सडक अर्जुनी येथील आशीर्वाद लॉन येथे आयोजित करण्यात आला होता. सविस्तर असे की,

कुंभराज जी लांजेवार (मार्गदर्शक) व सडक/अर्जुनी परिसरातील जेष्ठ सेवकांच्या नियोजना खाली आशिर्वाद लाॅन (शेंडा रोड) सडक/अर्जुनी येथे मा.मोहरसिंग बघेल यांच्या निवास्थानी एका भगवंताचे मासिक नववे हवन कार्य पार पडले . त्या निमित्त एका भगवंताची चर्चा बैठक कार्यक्रम संपन्न झाला.

या बैठकीत मंचकावर उपस्थित मान्यवरांनी जूमदेव बाबा यांनी सांगितलेल्या मार्गावर माहिती सांगितली. तसेच आपल्या सेवकांचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.राजुजी मदनकर साहेब (अध्यक्ष,परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर,नागपूर), विशेष अतिथी मा.मोरेश्वरजी गभने साहेब (सहसचिव,परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर,नागपूर),

मा.टिकारामजी भेंडारकर साहेब (संचालक,परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर,नागपूर) , शालिंदर जी कापगते, संपादक डॉ.सुशिल लाडे, तसेच परिसरातील सर्वच मार्गदर्शक व ज्येष्ठ सेवक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालक मा.निलेशजी शहारे व प्रशांतजी शिडाम यांनी केले. सदर कार्यक्रमाला परिसरातील अंदाजे २००० च्या संख्येने सेवक व सेविका उपस्थित असल्याचे दिसून आले.

error: Content is protected !!