अग्रवाल ग्लोबल कंपनीचा कारभार चव्हाट्यावर
*अग्रवाल ग्लोबल कंपनीचा कारभार चव्हाट्यावर
*नवनिर्मित उड्डाण पुलाची भिंत पडून, खड्ड्यांचे साम्राज्य : खा. प्रशांत पडोळे यांची मोका चौकशी
सडक अर्जुनी – गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर पुलांचे बांधकाम करत असलेल्या अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या निकृष्ट बांधकामाची पोलखोल यावर्षीच्या पावसाने केली आहे. पुलावरील मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याची घटना ताजी असतानाच,गुरुवारी (ता. ८) रोजी चक्क उड्डाण पुलाची भिंत खचल्याची दुदैर्वी घटना घडली. या घटनेत सुदैवाने मोठी हानी झाली नाही.मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वरील होणारे वन्यप्राण्यांचे अपघात रोखण्यासाठी गेल्या अडीच वर्षां पासून पुलांचे बांधकाम सुरू आहे.
बांधकामाचे कंत्राट अग्रवाल ग्लोबल कंपनीला देण्यात आले आहे. सुरुवातीच्या काळापासूनच या कंपनीकडून करण्यात येणाऱ्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अनेक ठिकाणचे बांधकाम निकृष्ट झाल्याची पावती काम देत आहेत. यंदा पावसाच्या प्रमाणअतिजास्त असल्यामुळे अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या निकृष्ट बांधकामाची पोलखोल पाण्याने केली असल्यामुळे, मासुलकसा घाटातील चक्क उड्डाण पूलाची भिंतच पडली.सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
नेहमीच अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या बांधकामावर प्रश्न चिन्ह उपस्थित करून प्रसार माध्यमानी वेळोवेळी बातम्या प्रसारित केल्या होत्या. याच प्रसार माध्यमांच्या बातम्यांची दखल घेत शेवटी खा.प्रशांत पडोळे यांनी अग्रवाल ग्लोबल कंपनीला चक्क भेट देत बांधकाम होत असलेल्या ठिकाणी पाहणी करून, चौकशीचे आदेश धडकावले.
या प्रसंगी दिलीप बनसोड जिल्हाध्यक्ष, मधुसूदन दोनोडे, रोशन बडोले, निशांत राऊत, किशोर शेंडे, तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.