नगरसेवक दानेशभाऊ साखरे यांच्याकडून दीपस्तंभ वाचनालयाला स्पर्धा परीक्षेचे पुस्तके भेट
अर्जुनी मोरगाव – प्रतिनिधी –केशोरी / भरनोली येथे दीपस्तंभ वाचनालय आहे. या वाचनालयामध्ये परिसरातील राजोली, भरनोली, कन्हाळ गाव, तळेगाव, खडकी, बामणी,ईळदा, आजूबाजूचे गावचे अनेक विध्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. या वाचनालयाच्या माध्यमातून अति संवेदनशील व जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गावातून अनेक विद्यार्थी वाचनालय मध्ये ज्ञानार्जनासाठी येत असतात .
त्या ठिकाणी तलाठी आदरणीय शेख यांच्या नेतृत्वामध्ये अनेक मार्गदर्शक स्पर्धा परीक्षा बद्दल माहिती देत असतात .त्यामुळे दीपस्तंभ वाचनालय च्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक युवकांना शासन दरबारी नोकरी मिळाली आहे .जवळपास आतापर्यंत 20 ते 25 विद्यार्थ्यांना नोकरी मिळवलेली आहे. दीपस्तंभ वाचनालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचे आयुष्य उज्वल करण्यासाठी एक दीपा प्रमाणे काम करीत आहे. अर्जुनी/ मोरगाव येथील नगरसेवक, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, दानेस भाऊ साखरे यांनी दोन महिन्यापूर्वी या वाचनालयाला भेट दिली होती.
आपणास कोणत्या अडचणी आहेत असे त्यांनी विचारले असता, तेथील विद्यार्थी व मार्गदर्शक तलाठी शेख यांनी स्पर्धा परीक्षेचे पुस्तक आपण उपलब्ध करून द्याव्यात. ही मागणी केलेली होती. त्यामुळे सन्माननीय नगरसेवक दानेस भाऊ साखरे यांनी त्यांची मागणी मान्य करून, स्पर्धा परीक्षा चे पुस्तक त्यांना उपलब्ध करून दिले. जवळपास या वाचनालय मध्ये शंभर ते सव्वाशे विद्यार्थी अभ्यास करीत आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना नगरसेवक दानेशभाऊ साखरे यांनी आज वाचनालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षचे पुस्तके भेट देण्यात आली. या वेळी अनिल लाडे सर केशोरी, तुषार बडोले सर , उच्च पशुवैदेकीय अधिकारी, नावेद शेख तलाठी भरनोली ,आर.के. जांभुळकर तालुकाध्यक्ष सा. न्या.वि.अर्जुनी/ मोर. कुंदन गहाणे, कोमेश ताराम आणि विद्यार्थी उपस्थित होते.