म्हसवाणी येथे युवा रुरल असोसिएशन कडून मेगा पाणलोट प्रकल्पाची बैठक संपन्न
*म्हसवाणी येथे युवा रुरल असोसिएशन कडून मेगा पाणलोट प्रकल्पाची बैठक संपन्न
*रा हा यो कामामध्ये सहकार्य करणार-
सडक अर्जुनी – तालुक्यातील 51 गावांना मार्गदर्शन व ईपीआरए ची काम पूर्ण. ग्राम म्हसवाणी तालुका सडक/ अर्जुनी गावांमध्ये युवा रुरल असोसिएशन या संस्थेकडून हाय इम्पॅक्ट मेगा वाटरशेड प्रकल्प राबविण्यात येत आहे . या प्रकल्प अंतर्गत तालुक्यातील 51 गावांमध्ये ग्रामीण सहभागीय मूल्यांकन प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या प्रकल्पातील समाविष्ट सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामीण भागातील एकूण 35 ग्रामपंचायती व 51 गावांचा संस्थेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रक्रियेच्या माध्यमातून गावचा सामाजिक नकाशा, गाव नकाशा , जमिनीचे वर्गीकरण व जमीन वापर , या प्रकारचे सर्व नकाशे ग्रामस्थांच्या सहकार्याने तयार करण्यात आले . या नकाशाच्या माहितीच्या आधारे (डी पी आर ) सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता सहभागीय मूल्यांकन प्रक्रियेच्या माध्यमातून घेतलेल्या माहितीचा वापर करण्यात येणार आहे . प्रकल्प अहवालातील प्रस्तावित कामे राष्ट्रीय महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत . प्रकल्पातील समाविष्ट सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामीण भागातील एकूण 51 गावांना युवा रुरल असोसिएशन व भारत रुरल लाहिव्हलीहूड फाउंडेशन मार्गदर्शन करणार असून रोजगार हमी योजना यशस्वीपणे राबविण्यात सहकार्य करणार आहे.
ग्रामीण सहभागीय मूल्यांकन , शिवार फेरी, नकाशा वाचन अशा विविध बाबींच्या माध्यमातून पाणलोट विकासाची कामे गाव स्तरावर राबविण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येक हाताला काम जमिनीला पाणी व कुटुंबाचे उत्पन्न दुप्पट करणे असा ध्येय डोळ्यासमोर ठेवून संस्था काम करत आहे.
या प्रक्रियेचा भाग म्हणून मौजे मसवाणी येथे ग्रामपंचायत कार्यालयात पानलोटाची विविध कामे गाव स्तरावर कसे राबवावे, शेततळे, 5% मॉडल , मजगी , फळबाग लागवड , गुरांसाठी गोठा, नाडेप, सिंचन विहीर अशा विविध योजनांच्या सोबत माथा ते पायथा जलसंधारणाचे कामे करून गाव पाणीदार करण्यासाठी चे मार्गदर्शन टीम लीडर श्री आनंद सूर्यवंशी सर यांच्याकडून उपस्थित ग्रामस्थांना करण्यात आले . तसेच उपजीविकीचे विविध माध्यम व त्यातून रोजगार निर्मिती, उद्योग निर्मिती गाव स्तरावर राबविणे बाबतची माहिती श्री ईश्वरी जी पटेल यांनी सांगितले.
या सविस्तर प्रकल्प अहवाल च्या बैठकी करिता गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री प्रकाश जी रहांगडाले , सौ वनिताताई राऊत उपसरपंच , ज्योतीताई रहांगडाले, सदस्य , नितीरामजी भोयर सदस्य , रोजगार सेवक युवराज मानकर, ग्रामपंचायत शिपाई कर्मचारी बापुदास मोहुर्ले, शेतकरी बांधव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता श्री पुरुषोत्तम खोटेले सीआरपी यांनी परिश्रम घेतले.