सडक अर्जुनी – कोहमारा मार्गात विनंती थांबा केव्हा होणार? अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
सडक अर्जुनी – कोहमारा ह्या तीन किलोमीटर अंतरामधील आर के पेट्रोल पंपाजवळ नगरपंचायत च्या आरक्षित जागेत विनंती थांबा केव्हा होणार? असा सवाल सडक अर्जुनी वाशी करीत आहेत.
कोहमारा – सडक अर्जुनी मार्गाच्या मधोमध नगरपंचायतचे आरक्षित जागा आहे, त्या ठिकाणी बसेसचा विनंती थांबा देण्याची मागणी ,गेल्या अनेक वर्षापासून होती, त्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपूर्वी पेट्रोल पंप जवळ गोंदिया , नागपूरकडे जाणाऱ्या बसेस थांबत होत्या, पण कोणत्या कारणाने तो थांबा, बंद करण्यात आला, हे मात्र कळू शकले नाही.
हा विनंती थांबा, बंद केल्यामुळे सडक/ अर्जुनी वाशीयांना दीड किलोमीटर पायदळ परिसरातील कॉलनीमध्ये जावे लागते. नवनिर्वाचित खासदार प्रशांत पडोळे, अर्जुन मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी लक्ष देऊन सडक अर्जुनी – कोहमारा मार्गातील विनंती थांबाची सुविधा करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
ह्या मार्गात नगरपंचायत ची आरक्षित जागा असल्यामुळे, त्या ठिकाणी बस निवारा निर्माण करून , बस थांबा देण्याची गरज आहे. गेल्या दोन वर्षापासून पेट्रोल पंप च्या बाजूला आरक्षण जागा असा फलक लावून ठेवला आहे, हे विशेष! मात्र त्या जागेचा उपयोग होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
पेट्रोल पंप परिसरात शिक्षक कॉलनी ,प्रगती कॉलनी, राजीव गांधी महाविद्यालय परिसर, न्यू कॉलनी , एच अँड टी कॉलेज परिसर , को-ऑपरेटिव बँक , भारतीय स्टेट बँक,रवी नंदा हायस्कूल मधील हजारो नागरिक , शालेय विद्यार्थी ये जा करतात . त्यांनी बसने प्रवास केल्यास सडक अर्जुनी शहरापासून ये जा करण्यास कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
नगरपंचायतीच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पेट्रोल पंप जवळील आरक्षित जागेत बस थांबा देण्याची मागणी नगर वासियांनी केली आहे.