Monday, May 12, 2025
अर्जुनी मोरसड़क अर्जुनी

अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्र यात्रा,सभा सम्मेलन व मेळाव्याने गजबजला

अर्जुनी मोर.( सुरेंद्रकुमार ठवरे ) – महाराष्ट्र विधानसभा निवडणुक दिड ते दोन महिण्यावर येवुन ठेपली आहे. येत्या आक्टोंबर महिण्याच्या दुस-या आठवड्यात राज्यात निवडणुक आचारसहिंता जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. अशातच 63 अर्जुनी मोर. विधानसभेसाठी सर्वच पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मतदारांच्या भेटीगाठी, विविध प्रकारचे आरोग्य शिबीर, सभा, सम्मेलन व लहान मोठे मेळावे,व विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून यात्रा महायात्रा,व जनसंवाद यात्रेने सध्यातरी अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्र गजबजुन गेला आहे.तर बॅनर पोस्टरची निव्वळ आतिशबाजी सुरु आहे. 

अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्र सन 2009 ला अस्तित्वात येवुन अनुसूचित जाती प्रवर्गासाठी साठी राखीव आहे. दोन वेळा या विधानसभा क्षेत्रातुन भाजपाचे राजकुमार बडोले हे निवडुन आले. तर 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजीत पवार गटाचे मनोहर चंद्रिकापुरे हे निवडुन आले. आता विधानसभा निवडणुक 2024 तोंडावर येवुन ठेपली आहे. त्यानिमीत्ताने अर्जुनी मोर. विधानसभेसाठी सर्वच पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवारांनी कार्यक्रमांचा धुमधडाका सुरु केला आहे. गेल्या वर्षभरापासुन सर्वच पक्षातील संभाव्य उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.अजुन महायुतीत आणी महाविकास आघाडी मधे जागा वाटपाचा गुंता सुटायला आहे. मात्र उमेदवार कामाला लागले आहेत. बॅनरबाजीने विधानसभा क्षेत्रात पोस्टरयुध्द सुरु झाले आहे.

नुकताच भाजपाचे संभावित उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी या विधानसभा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय बौध्द धम्म परिषद, आदिवासी समाजाचे मोठमोठे मेळावे,तसेच गृहभेटीच्या माध्यमातून भाजप कार्यकर्यांच्या भेटीगाठीतुन पक्षबांधनी मोहीमेला मोठी गती दिली असुन सध्यातरी बडोले यांचे संदर्भात मोठी आपुलकी व सहानुभुतीची प्रचंड लाट दिसुन येत आहे, तर मागील महिन्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाचा शिवस्वराज यात्रेचे निमित्ताने अर्जुनी मोर. येथे मोठा विशाल मेळावा घेण्यात आला. तर काॅग्रेस कडुन सुध्दा सभा मेळावे व लहान मोठे कार्यक्रम सुध्दा घेण्यात आले आहे.या विधानसभा क्षेत्रात काॅग्रेसची बाजु सध्यातरी भक्कम दिसुन येत आहे. विद्यमान आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेस अजीत पवार गटाचे नेते मनोहर चंद्रिकापुरे यांनीही विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून संपुर्ण मतदार संघ पिंजुन काढला असुन आता..

भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र अस्तीधातु दर्शन सोहळ्याचे निमीत्त अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रात “अस्थिकलश महायात्रा येत असुन 27 सप्टेंबर ला सकाळी 10 वाजता कृऊबा समिती अर्जुनी मोर येथे व तेजस्वीनी लाॅन सडक / अर्जुनी येथे दुपारी 2:30 वाजता अस्थिकलश महायात्रा येत असुन दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यासोबतच त्यांनी विविध आरोग्य शिबीर व अन्य मेळाव्याचे माध्यमातून कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे. तर वंचीत बहुजन आघाडीच्या माध्यमातुन अनुसूचित जाती-जमाती, ओबीसींच्या, व जनसामान्यांच्या हक्काच्या लढाई करीता वंचीत तर्फे “आरक्षण बचाव जनसंवाद यात्रेचे आयोजन संपुर्ण विधानसभा क्षेत्रात 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत काढण्यात येणार आहे. तर अनेक इच्छुक उमेदवारांनी आंदोलने मेळावे, विविध आरोग्य शिबीरातुन जनसामान्यांसोबत हितगुज साधण्याचे काम केले आहे.त्यामुळे अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्र यात्रा सभा सम्मेलने, व मेळाव्याने तथा बॅनर पोस्टरच्या आतीशबाजीने गजबजुन गेला आहे.

error: Content is protected !!