अर्जुनी मोर. विधानसभा ही जागा काॅग्रेसला की शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी ला ???
अर्जुनी मोर – (सुरेंद्रकुमार ठवरे) – महाराष्ट्र विधानसभा निवडणुक( 2024) दिड ते दोन महिण्यावर येवुन ठेपली आहे. कधीही निवडणुकीची घोषणा होवुन आचारसहिंता लागु शकते.महाराष्ट्रात महविकास आघाडी, व महायुतीचे गठबंधन आहे. अजुन जागेचा तिढा सुटायला आहे.मात्र सर्वच पक्षातील संभाव्य उमेदवार बाशिंग बांधून तयार आहेत. अनुसूचित जाती साठी राखीव असलेल्या अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रात महविकास आघाडी मधे ही जागा आपल्याच पक्षाला मिळावी म्हणुन काॅग्रेस व शरद पवार राष्ट्रवादी गट यांचेमधे घमासान दिसत आहे.दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा केल्याने सध्या तरी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
63 अर्जुनी मोर.विधानसभा क्षेत्र हा विस्ताराने खुप लांब आहे.मागील पार पडलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत या विधानसभेतुन महविकास आघाडी चे उमेदवार खा.प्रशांत पडोळे यांना जवळपास 20 हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे पुढे होवु घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काॅग्रेस पक्षाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमधे मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.आजघडीला काॅग्रेस कडुन 17 इच्छुक उमेदवारांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे अर्ज सादर केले आहेत.तरीही 25 ते 30 उमेदवार बाशिंग बांधून तयार आहेत.सध्या राज्यात महाविकास आघाडी मधे काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट,उबाठा शिवसेना गट यांची आघाडी आहे.तर महायुतीमधे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजीत पवार गट,व शिवसेना शिंदे गट,व भाजपाची युती आहे.या विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार राष्ट्रवादी चे आहेत.विद्यमान आमदार हे अजीत पवार गटाचे आहेत.त्यामुळे राष्ट्रवादी च्या दोन्ही गटांनी अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रात दावा केला आहे.
अनुसूचित जाती आणि जमाती व इतर मागासप्रवर्गाचे प्राबल्य असलेल्या अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रात मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ला अच्छे दिन आले होते. तरीही भाजपाचीही स्थिती येथे मजबूत बनत चालली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाल्याने मतांची विभागणी झाली.अशात सहकारी पक्षांच्या भरवशावर या विधानसभा क्षेत्रात दोन्ही राष्ट्रवादी गट दावा करीत असले तरी महायुती मधे भाजपाचे मतदार मात्र लोकसभा निवडणुकीची आठवन विसरु शकत नाही. मात्र गोपनीय सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार अर्जुनी मोर. विधानसभा महाविकास आघाडीतुन काँग्रेस पक्षाकडे जाणार अशी विश्वासनीय माहीती आहे. मात्र काँग्रेस मधे सध्यातरी उमेदवारीवरुन प्रचंड तणाव पहावयास मिळत आहे.बाहेर क्षेत्रातील उमेदवार चालणार नाही. असा सुर काही इच्छुक उमेदवारांनी केला असुन तशा पध्दतीचा पत्रव्यवहार इच्छुक 13 उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींकडे केला असल्याची विश्वासनीय माहीती आहे. तर महाविकास आघाडी कडुन शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस नी सुध्दा जबरदस्त फिल्डींग लावल्याचे दिसत आहे.मागील महिन्यात शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी गोंदिया मुक्कामी तसी घोषणा सुध्दा केल्याची माहिती आहे.तर शरद पवार गटातर्फे 10 सप्टेंबर ला अर्जुनी मोर येथे शिवस्वराज यात्रेनिमित्य मोठे शक्तीप्रदर्शन करून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकण्यात आल्याने काग्रेसमधे धकधक वाटायला लागली आहे. अर्जुनी मोर. विधानसभा सिट महायुतीतुन, किंवा महाविकास आघाडीतुन नेमक्या कोणत्या पक्षाला जाते.हे येणा-या दिवसात कळेल त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार.