महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांना बहुमताने निवडुन आणु- माजी आमदार राजेंद्र जैन
सडक अर्जुनी/ अर्जुनी मोर – महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांना सर्वशक्तीनिशी निवडुन आणु- माजी आमदार राजेंद्र जैन अर्जुनी मोर.व सड़क/ अर्जुनी येथे राष्ट्रवादीची समन्वयक बैठक येत्या 20 नोव्हेंबर ला होवु घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातुन महायुती व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार ईंजी.राजकुमार बडोले यांना सर्व शक्तीनिशी प्रचंड मताधिक्यानी निवडुन आणा असे आवाहण राष्ट्रवादी कॉंग्रेस चे जेष्ठ नेते व माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
सडक/अर्जुनी येथे तेजस्वीनी लाॅन व अर्जुनी मोर. येथे साईश्रध्दा लाॅन येथे ता.25 रोजी दोन्ही तालुक्यातील तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या प्रमुख कार्यकर्ता व पदाधिका-यांच्या महत्वपूर्ण बैठकित राजेंद्र जैन बोलत होते. यावेळी महायुती चे उमेदवार राजकुमार बडोले प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना राजेंद्र जैन म्हणाले की येणारी विधानसभा निवडणुक महायुती च्या माध्यमातुन मान.प्रफुलभाई पटेल,अजीत पवार ,देवेंद्र फडणवीस, व एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात लढविण्यात येत असुन अर्जुनी मोर. विधानसभेत महायुती चे उमेदवार राजकुमार बडोले यांना बहुमताने निवडुन आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच महायुतीमधील मित्रपक्षांनी मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांशी संवाद व समन्वय साधुन कामाला लागावे असे आवाहण केले,तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांनी आपसी हेवेदावे व कोणतेही भेदभाव न बाळगता खासदार प्रफुल पटेल यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवुन महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांना बहुमतांनी निवडुन आणण्याचे आवाहन राजेंद्र जैन यांनी केले.
यावेळी महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी मित्र पक्षाचे कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना सिंचन,शेती, रोजगार, पर्यटन विकास, तसेच महायुती सरकारच्या जनकल्याणकारी योजना तथा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अविरत चालु ठेवण्यासाठी तथा अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्राचा व महाराष्टाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी व प्रगतशिल महाराष्ट्रासाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना निवडुन देण्याचे आवाहण केले. सभेत उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष, सेल व आघाड्यांच्या तालुकाध्यक्षांनी महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांना भरघोस मतांनी निवडुन आणण्यासाठी पुर्ण शक्तीनिशी काम करु असे आश्वासन दिले.
यावेळी बैठकिला राजेंद्र जैन, उमेदवार राजकुमार बडोले,यशवंत गणवीर, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे, लोकपाल गहाणे, नामदेव डोंगरवार, दानेश साखरे, नारायणराव भेंडारकर,उध्दवराव मेंहदळे, योगेश नाकाडे, मंजूषा बारसागडे,सुशिला हलमारे,सुशिला राऊत, घनश्याम मेहता, राकेश जायस्वाल, किशोर ब्राम्हणकर, आम्रपाली डोंगरवार, हर्षा राऊत, लता द्रृगकर, निशा मस्के, नागपुरेताई, रतिराम राणे,सागर आरेकर, माधुरी पिंपळकर, चित्रलेखा मिश्रा, माधुरी बनपुरकर, अनिशा पठाण, तसेच सडक/अर्जुनी येथील डाॅ अविनाश काशीवार, डि.यु.रहांगडाले, सुधाताई रहांगडाले, गजानन परशुरामकर, राजलक्ष्मी तुरकर, वंदना डोंगरवार, देवचंद तरोणे, भैय्यालाल पुस्तोळे, रुपविलास कुरषुंगे,शिवाजी गहाणे, दिक्षाताई भगत, खेडकरजी, आनंद अग्रवाल, जगदिश लोहिया, व मोठ्या संख्येने इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.