आपल्या हक्काचा माणूस डॉ.सुगत आला रणांगणात, डॉ.सुगत चंद्रिकापुरे ने केले आज निवडणुकीचे नामांकन दाखल
अर्जुनी मोर- विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची राष्ट्रवादी कांग्रेस महायुतीने ऐनवेळी उमेदवारी कापल्याने या अन्यायाविरोधात बंड पुकारुन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आपला मुलगा डाॅ.सुगत चंद्रिकापुरे यांना पुढे करुन अर्जुनी मोर विधानसभेच्या आखाड्यात उतरवीले आहे.आज निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटच्या दिवसी हक्काचा माणुस डाॅ.सुगत चंद्रिकापुरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत प्रहार पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.यावेळी प्रहारचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार बच्चु कडु, आमदार मनोहर चंद्रिकापुरे व प्रहार चे स्वतंत्र उमेदवार डाॅ.सुगत चंद्रिकापुरे यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या रॅली सह अर्जुनी मोर. शहरात रोड शो केला.P
राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी राष्ट्रवादी कांग्रेस ला संकटाचे वेळी खासदार प्रफुल पटेल यांचे शब्दाला मान देऊन राष्ट्रवादी अजीत पवार गटाला साथ दिली.मात्र या निवडणुकीत प्रफुल पटेल व अजीत पवार यांनी आपल्या पाठित खंजीर खुपसुन आपली उमेदवारी कापली याचे तिव्र दु:ख झाल्याने सर्वप्रथम या बाबीचा आपन निषेध करतो असी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आमदार चंद्रिकापुरे यानी आपल्या मुलासह ऐनवेळी प्रहार संघटनेत प्रवेश करीत निवडणुकीचा शंखनाद फुंकला आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटच्या दिवसी अर्जुनी मोर. शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करीत प्रहार संघटनेकडुन स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रशन्न लाॅन अर्जुनी मोर. येथुन ढोल ताशांच्या गजरात प्रचंड आतषबाजीत अभुतपूर्व रॅलीला सुरवात झाली.खुल्या गाडीत आमदार बच्चुभाऊ कडु,आमदार मनोहर चंद्रिकापुरे,स्वतंत्र उमेदवार डाॅ.सुगत चंद्रिकापुरे यांनी आपल्या परिवारासह हजारो महीला पुरुष व कार्यकर्त्यांसह शहराचे मुख्य मार्गाने महाराणा चौकापर्यंन्त अभुतपूर्व रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
डिजे.व ढोलताश्यांच्या आवाजाने संपुर्ण अर्जुनी मोर. शहर दुमदुमुन गेले होते.हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थीतीने संपुर्ण अर्जुनी मोर. शहराला जत्रेचे स्वरुप आले होते.गर्दीवर व रहदारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीसांची दमछाक झाली.या अभुतपूर्व शक्तिप्रदर्शनाने राष्ट्रिय पक्षांच्या उमेदवारांना नक्कीच धडकी भरली असावी अशा चर्चा लोक करीत होते.