Tuesday, May 13, 2025
गोंदियासड़क अर्जुनी

छाननी प्रक्रियेत जिल्ह्यातील चार मतदारसंघात 134 नामनिर्देशनपत्र ठरले वैध

गोंदिया : येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या अर्जांची आज छाननी करण्यात आली. या छाननीमध्ये गोंदिया जिल्ह्यात 134 नामनिर्देशनपत्र वैध ठरले असून 19 अवैध ठरले आहेत. तसेच नामांकन दाखल केलेल्या उमेदवारांना नामनिर्देशन मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

63-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात 40 नामनिर्देशनपत्र वैध ठरले असून 06 अवैध ठरले आहेत, त्यामुळे सद्यस्थितीत सदर मतदारसंघात एकूण उमेदवारांची संख्या 35 आहे. 64-तिरोडा विधानसभा मतदारसंघात 36 नामनिर्देशनपत्र वैध ठरले असून 03 अवैध ठरले आहेत, त्यामुळे सद्यस्थितीत सदर मतदारसंघात एकूण उमेदवारांची संख्या 27 आहे. 65-गोंदिया विधानसभा मतदारसंघात 41 नामनिर्देशनपत्र वैध ठरले असून 05 अवैध ठरले आहेत, त्यामुळे सद्यस्थितीत सदर मतदारसंघात एकूण उमेदवारांची संख्या 28 आहे. 66-आमगाव विधानसभा मतदारसंघात 17 नामनिर्देशनपत्र वैध ठरले असून 05 अवैध ठरले आहेत, त्यामुळे सद्यस्थितीत सदर मतदारसंघात एकूण उमेदवारांची संख्या 13 आहे.

error: Content is protected !!