महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून द्या – खासदार प्रफुल पटेल –
राजकुमार बडोले अत्यंत शांत आणि संस्कारी व्यक्तिमत्त्व
अर्जुनी मोर – अर्जुनी मोरगाव विधानसभेत उमेदवारीचा निर्णय महायुतीच्या हितासाठीच करण्यात आला. व यशस्वी सर्व्हेनुसार राजकुमार बडोले यांना उमेदवारी देण्यात आली.भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रातील महायुतीच्या उमेदवारांना निवडुन आणण्याचा आम्ही संकल्प केला आहे.त्यामुळे अर्जुनी मोर. विधानसभेत महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ईंजी.राजकुमार बडोले हे शांत आणी संस्कारीत असुन त्यांचेकडे विकासाचा व्हिजन असल्याने बडोले यांना निवडुन आणण्याचा निर्धार करा असे आवाहन राष्ट्रवादी कांग्रेस चे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी केले.
सडक अर्जुनी येथील आशीर्वाद सभागृह येथे ता.6 महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांचे प्रचारार्थ आयोजित सभेत प्रफुल पटेल बोलत होते.सभेला आमदार डाॅ.परिणय फुके,उमेदवार राजकुमार बडोले,राष्ट्रवादीचे यशवंत गणवीर, गटनेते लायकराम भेंडारकर, जि.प.सदस्य रचनाताई गहाणे, तसेच महा युतीच्या मित्र पक्षाचे सर्व ने नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना खा.पटेल म्हणाले की काही लोक संविधान बदलणार व आरक्षण बंद होणार अशा अफवा पसरवुन सत्ता मिळविण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात.मात्र संविधान व आरक्षण कधीच बदलणार नाही किंवा आरक्षण बंद होणार नाही असी ग्वाही मी आज देतो .हा महाराष्ट्र थोर महापुरुषांचा व थोर संताचा आहे.व त्याचे विचारानेच चालणार असुन महायुती सरकार संत महापुरुषांचा आदर करुन समृध्द महाराष्ट्र साकारणार, महायुती सरकारनी लोकोपयोगी सुरु केलेल्या संपुर्ण योजना अविरत चालणार असुन लाडकी बहीण योजना 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचा संकल्प महायुती सरकार करणार आहे.केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनी 10 वर्षात भारताला विकासाच्या प्रवाहात आणुन चेहरा मोहरा बदलविला आहे,शेतकरी सन्मान निधी सारख्या असंख्य योजना राबविल्या आहेत.यावर्षी धानाला 25 हजार बोनस देण्याचे आम्ही ठरविले आहे.लोकांच्या हितासाठी आम्ही भंडारा-गोंदिया जिल्ह्यात विविध योजना, प्रकल्प आणले आहेत. अर्जुनी मोरगाव विधानसभेत जनतेची कामे करणारा, क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधणारा जनप्रतिनिधी आमदार म्हणुन निवडायचे आहे. महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले हे शांत व संस्कारी व्यक्तीमत्व आहेत.त्यामुळे या क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राजकुमार बडोले यांना रेकॉर्ड ब्रेक मतनी निवडुन आणा असे आवाहणही प्रफुल पटेल यांनी केले. यावेळी आमदार परिणय फुके,उमेदवार राजकुमार बडोले यांनीही मार्गदर्शन करुन निवडुन देण्याचे आवाहन केले.