Sunday, August 24, 2025
सड़क अर्जुनी

संविधान दिनाचे औचीत्य साधून डुग्गीपार पोलीसांनी केले रक्तदान शिबीराचे आयोजन

सडक अर्जुनी – 26 नोव्हेंबर संविधान दिवस तसेच मुंबई शहर येथे आतंकवादि हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/अंमलदार व नागरीक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोंदिया जिल्हा पोलीस दल, कल्पतरु बहुउद्देशिय संस्था, लोकमान्य ब्लड सेंटर गोंदिया व एचडीएफसी बँक गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने लोककल्याण कार्यास सहकार्य करण्याकरीता पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर रक्तदान शिबिराचे उदघाटन मा डॉ श्री विक्रम आव्हाड सा.,न्यायाधीश, सडक अर्जुनी कोर्ट यांचे हस्ते झाले. सदर रक्तदान शिबीरात मा न्यायाधिश साहेब्,पोलीस स्टेशन डुग्गीपार येथील अधिकारी/अंमलदार, पोलीस पाटील तसेच पो.स्टे.कार्यक्षेत्रातील नागरीक अश्या 71 दात्यांनी रक्तदान केले.

सदर रक्तदान शिबीर श्री.गोरख भामरे पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री.नित्यानंद झा अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, श्री.विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री.मंगेश काळे पो.स्टे.डुग्गीपार व डुग्गीपार पोलीस स्टॉफ यांनी आयोजीत केले.

error: Content is protected !!