लोहिया विद्यालयात बालविवाह प्रतिबंधक शपथ घेण्यात आली
सौंदड – येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सौंदड येथे दिनांक २७/११/२०२४ रोज बुधवारला विद्यालयात केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या बालविवाह मुक्त भारत या मोहिमेअंतर्गत लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक संस्थाध्यक्ष मा. जगदीशजी लोहिया यांच्या प्रेरणेने व विद्यालयाच्या प्राचार्या मा. उमा बाच्छल यांच्या मार्गदर्शनानुसार बालविवाह म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले आणि त्यांना बाल विवाह मुक्त भारतची शपथ देण्यात आली. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.