आपकारिटोला शाळेचा अभिनव उपक्रम , परसबागेतील भाजीविक्री करून विद्यार्थ्यांना दिले व्यवहाराचे धडे
सडक.अर्जुनी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपकारीटोला शेंडा केंद्रातील आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील सुंदर व सुसज्ज असलेली प्राथमिक शाळा आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पूर्ण विकासासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते. सडक अर्जुनी तालुक्यातील परसबाग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेली शाळा आहे.
विद्यार्थी,पालक व शिक्षक यांच्या सहकार्याने शाळेमध्ये सुंदर परसबाग फुलवलेली आहे. परत बागेमध्ये विविध प्रकारच्या फळभाज्या व फुलेभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. परसबागेतील पालेभाज्या व फळभाज्यांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शालेय पोषण आहारात सुद्धा केला जातो.
एक ते चार वर्ग असलेल्या लहानशा शाळेतील विद्यार्थी परसबागेची काळजी करून पालक व शिक्षकांच्या सहकार्याने शेती विषयक ज्ञान अर्जित करतात.
यातच शालेय पोषण आहारामध्ये पालेभाज्या व फळभाज्याच्या उपयोगाच्या व्यतिरिक्त उरलेली पालेभाजी भाजीपाला व्यापारी योगेश्वर राऊत यांना विक्री करून विद्यार्थ्यांना व्यवहाराचे ज्ञान दिले जाते.
यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धर्मेंद्र जी मडावी, उपाध्यक्ष शोभाताई तेकाम व रेखा उईके, मदतनीस सीमा मडावी व विशेष कार्य केल्याबद्दल पोषण आहार मदत निश सौ हिराबाई उईके व शाळेचे सहाय्यक शिक्षक ललित फुंडे सर व शालेय मंत्रिमंडळाचे शाळेचे मुख्याध्यापक किशोर बावनकर यांनी कौतुक केले.