नगरपंचायत हद्दीत लाखो रुपयांच्या सिमेंट रोड ची होत आहे ऐसी की तैशी..
सडक अर्जुनी – संपादकीय – विकास.. विकास.. विकास.. नगरपंचायत सडक अर्जुनी द्वारे नगराचा विकास कार्य जोरावर चालले आहे असे पोबारा नागरिकांमध्ये आहे. शासना द्वारे नगराच्या उद्धाणा साठी लाखो करोडो रुपये फंड दिला जातो. त्याचे नियोजन खुर्चीवर बसलेले जनप्रतिनिधी करीत असतात. नगर पंचायत मध्ये एकूण १७ प्रभाग आहेत . या १७ प्रभागामध्ये आवश्यकतेनुसार रोड नाली चे बांधकाम करण्याकरिता लाखो रुपयांची निधी खर्च केली जाते.
नागरिकांना सुविधा देण्यासाठी नगरपंचायत रोडाचे ,नालीचे निर्माण करतो. परंतु सध्या ह्या नगरपंचायत चे सिमेंट रोड ची ऐसी की तैशी होत असल्याचे चित्र दिसत आहे.
सध्या नगरामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. एक तर रेती घाट संपूर्ण तालुक्यात बंद आहेत. ह्या बांधकामा करिता वाळू ची आवश्यकता पडते. ही आवश्यकता पूर्ण करण्याच्या नादात बैलबंडी द्वारे वाळू वाहतूक करणारे चालक हे बैलबंडी ने शासनाचा महसूल बुडवीत अवैध मार्गाने वाळू वाहतूक करीत असतात. मात्र लाखो रुपयांची निधी खर्च करून निर्माण केले असलेले सिमेंट रस्ते हे बैलबंडीच्या चाकाने उखडत चालले आहेत. एकतर कंत्राटदारांनी तयार केलेल्या सिमेंट रोड ची क्वालिटी कमी दर्जाची असल्याची बोलले जाते. आता दुसरी कडे ह्या बैलबंडी ने वाळू वाहतूक करणारे शासनाचा महसूल बुडवीत आणखी त्या रोडची ऐसी की तैशी करून रोडची काल मर्यादा कमी करीत असतात. मात्र प्रश्न हा निर्माण झाला आहे की, लाखो रुपयाचा निधी खर्च करून तयार करण्यात आलेले सिमेंट रोड चा वापर हा नागरिकांच्या सुख सोई साठी आहे की अवैध रित्या महसूल बुडवीत बैलबंडी ने वाळू वाहतूक करणाऱ्यांन करिता निर्माण केला गेला आहे ???!
काय म्हणतो कायदा
तर दुसरी कडे
मूक प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायदा १९६० अत्याचार व सुरक्षा अधिनियम अंतर्गत Animal Protection Acts 1960 एखाद्या मूखे प्राण्यांचे छळ करणे , बैल बंडीने मर्यादे पेक्षा जड ओझे वाहने ,मुक प्राण्यांना तूतारीने टोचणे , त्यांना इजा पोहोचवणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा नाही का.?
सडक अर्जुनी तालुक्यात आणि नगरपंचायत च्या हद्दीत विविध भागात रात्रीपासून पहाटेपर्यंत जवळील नाल्या आणि नदीपात्रातून कित्येक ट्रॅक्टर आणि बैलबंडीनी अवैधरित्या वाळूची वाहतूक होत आहे. हा प्रकार महसूल विभागालाही ठाऊक आहे. सदर नदी नाल्या पात्रातून वाळू उपसा झाल्यानंतर बैलगाडी रेतीतून व पाण्यातून वर चढवितांना बैलांना अमानुषपणे मारहाण केली जाते. यात क्षमतेपेक्षा जास्त वाळू लादून बैलगाडी वर चढवितांना बैलांना तोंडातून फेस येईपर्यंत अमानुषपणे अत्याचार होतात. यातच बैलगाडी रात्रीपासून पहाटेपर्यंत व दिवसभर बैलांना राबवून अडचणीच्या व चढणीच्या जागेंवरून काठीने झोडपून काढले जात असल्याचे विदारक चित्र सध्या सर्व जनता व प्रशासनापुढे उघडरित्या दिसत आहे. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असूनही प्रशासनाच्या लक्षात हे मूक प्राणी सुरक्षा अधिनियमांची जाणीव का होत नाही? हा प्रश्नच आहे.
यांकडे महसूल विभागाचे का लक्ष नाही. हे बैलगाडी चालक कोणालाही न विचारता अवैध मार्गाने शासकीय महसूल बूडवित कितीतरी ब्रॉसटन वाळूची दररोज तस्करी करतात. मूक प्राण्यांवर नदीघाटावर बेदम मारहाण करून अत्याचार करीत असल्याचे कित्येक नागरिक बोलत असतात.
महसूल विभाग आणि नगरपंचायत या अवैध रित्या वाळू वाहतुकीवर काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.