Monday, May 12, 2025
क्राइमगोंदियादेवरी

दोन जुगार अड्डयांवर पोलिसांचा छापा,लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया.-  गुप्त माहितीच्या आधारे देवरी आणि चिचगड पोलिसांनी जंगलात सुरू असलेल्या जुगार अड्यावर छापामार कारवाई करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच जुगार खेळणाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल केला. ही कारवाई रविवारी (दि. 26) करण्यात आली. देवरी पोलिस ठाण्याचे पोलिस नायक नामदेव समरीत आणि त्यांचे सहकारी गस्तीवर असताना कोयलारी जंगल शिवारात तासपत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे सापळा रचून त्यांनी जुगार अड्डयावर धाड टाकली. यावेळी आशिष वसंत बडोले ( 24 ), मनीष निताराम तरोणे (23, दोन्ही रा. कोयलारी), प्रकाश शंकर गायकवाड (36, रा. पुतळी),रजनीकांत गणेश वालदे ( 38, रा.कोयलारी), अनुप मोरेश्वर बड़ोले (29,रा. कोयलारी), मिथून नीलकंठ वालदे(35, रा. कोयलारी), सत्यपाल राजेंद्र शहारे ( 36, रा. कोयलारी), धर्मेंद्र वसंतराव साखरे (49, रा. कोयलारी) यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

Google photo
Google photo

त्याच्याकडून दुचाकी, रोख, मोबाइल असा एकूण 2 लाख 51 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून देवरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी कारवाई चिचगड पोलिसांनी फुटाणा जंगलात केली. यावेळी पोलिसांनी धाड टाकली असता बळीराम देवराम कचलाम(34, रा. सिंदीबिरी), निकेश पृथ्वीराज साखरे (32, रा. सिंदीबिरी), सुरेश जगुलाल बागडे (38, रा. फुटाणा),रोशन देवचंद बघवा (32, रा. फुटाणा),संजय पांडुरंग साखरे (39, रा. सिंदीबिरी)यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून 1 लाख 46 हजार 30 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून चिचगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार राऊत करीत आहे.

error: Content is protected !!