Monday, May 12, 2025
गोंदियासड़क अर्जुनी

गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांकरीता अतिरिक्त घरभाडे भत्त्याची टॅब सुरू करण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश

•गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांकरीता अतिरिक्त घरभाडे भत्त्याची टॅब सुरू करण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश

•महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या कार्याला यश जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांची माहिती

सडक अर्जुनी – संपूर्ण गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा आहे. आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी व अतिरिक्त घरभाडे भक्ता शासनाने लागू केलेला आहे.गोंदिया जिल्ह्यातील इतर सर्व कर्मचाऱ्यांना अतिरिक्त घरभाडे वेतन प्रणाली मध्ये सुरू आहे.परंतु मार्च 2023 पासून शालार्थ वेतन प्रणाली मधून गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांकरीता टॅब बंद करण्यात आली होती. गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांवरील या अन्यायाविरुध्द महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने लढा दिला.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या प्रयत्नामुळे लवकरच शालार्थ वेतन प्रणाली मध्ये अतिरिक्त घरभाडे भत्त्याची टॅब सुरू होणार आहे.गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांकरिता अतिरिक्त घरभाडे भत्त्याची टॅब शालार्थ वेतन प्रणाली मध्ये सुरू करण्यासंबंधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या वतीने गोंदिया जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगानंथम व प्राथमिक शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेचे फलित म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्राथमिक संचालनालय पुणे यांना दिनांक 17 ऑगस्ट 2024 ला पत्र लिहून टॅब सुरू करण्यासंदर्भात कळविले होते.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघ जिल्हा गोंदियाने गोंदिया जिल्ह्यातील आमदार राजकुमार बडोले आमदार विजयभाऊ रहांगडाले आमदार विनोदभाऊ अग्रवाल यांच्याशी चर्चा करून अतिरिक्त घरभाडे भत्त्याची टॅब सुरू करण्यासंबंधी चर्चा केली. यामुळे सर्व आमदार महोदयांनी शिक्षण संचालक पुणे यांना पत्र लिहून गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांकरिता अतिरिक्त घरभाडे भत्त्याची टॅब सुरू करण्यासाठी कळविले होते.गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांकरिता अतिरिक्त घरभाडे भत्त्याची टॅब सुरू झालीच पाहिजे यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदियाचे जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर व उपाध्यक्ष शंकर चौहान यांनी शिक्षण उपसंचालक देविदास कुल्हाड यांच्याशी सातारा येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महामंडळ सभेदरम्यान चर्चा केली. जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांनी शिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांच्याशी फोनवर चर्चा करून गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांच्या बंद झालेल्या अतिरिक्त घरभाडे भत्त्याच्या टॅब संबंधी चर्चा करून टॅब सुरू करण्यासंबंधी विनंती केली.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांच्या नेतृत्वाखाली ग्राहक सोसायटीचे उपाध्यक्ष शंकर चव्हाण शाखाध्यक्ष कैलाश हांडगे जिल्हा प्रतिनिधी गजानन रामटेके सरचिटणीस सुरेश अमले उपाध्यक्ष सत्यवान गजभिये रमेश बिसेन मनोज नेवारे यांनी शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे कार्यालयात शिक्षण उपसंचालक रमाकांत काटमोरे यांच्याशी भेट घेवून चर्चा केली.

यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या प्रयत्नाला यश आले.अतिरिक्त घरभाडे भत्त्याची टॅब सुरू करण्यासाठीची बहुप्रतीक्षित मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन पूर्ण केल्याचे जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांनी सांगितले.

गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांकारीता अतिरिक्त घरभाडे भत्त्याची टॅब शालार्थ वेतन प्रणालीमध्ये सुरू करण्याचे संचालकांनी आदेश दिल्यामुळे अतिरिक्त घरभाडे भत्ता मिळण्याचा अडथळा दूर झालेला आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या वतीने आमदार विनोदभाऊ अग्रवाल आमदार विजयभाऊ रहांगडाले आमदार राजकुमारजी बडोले जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामभाऊ भेंडारकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकजभाऊ रहांगडाले मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम. शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांचे गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षकांच्या वतीने आभार मानले आहे.

यासाठी विरेंद्र कटरे नूतन बांगरे उमाशंकर पारधी अयुब खान केदारनाथ गोटेफोडे अरविंद उके हेमंत पटले शंकर चौहान अनिरुद्ध मेश्राम सोमेश्वर मेश्राम मोरेश्वर बडवाईक राजेंद्र निंबार्ते लिकेश हिरापुरे गणेश चुटे वाय.डी.पटले सचिन राठोड सुनील सोनवणे लिकेश हिरापुरे प्रभाकर मेश्राम आर सी बिसेन राजेश रामटेके कैलाश हांडगे विनोद चौधरी महेंद्र चौहान सुरेश वाघाडे कृष्णा गभने शितल कनपटे सुरेश अमले चंदू दुर्गे राहुल कोणतमवार विजय डोये आर जी गोन्नाडे रमेश बिसेन मनोज नेवारे गजानन रामटेके अरविंद नाकाडे किशोर लंजे प्रशांत चव्हाण भुवन औरासे संदीप नंदेश्वर राजेंद्र बन्सोड कोमल नेवारे ओमेश्वरी बिसेन ओ.एस.बिसेन चंद्रशेखर दमाहे, माणिक घाटघुमर, तेजकुमार बिसेन, मनिष बलभद्रे, विजय लिल्हारे, मनिष राठोड, हर्ष पवार, सचिन वडीचार, ओमप्रकाश पटले, नंदू चित्रीव, देव जतपेले, सचिन धोपेकर, डी.सी. रहांगडाले,शंकर नागपुरे ,सुरेश मेश्राम जीतू गणवीर

गौरीशंकर खराबे संतोष कवरे दिलीप शिवणकर डि बी लांजेवार एन आर लांजेवार चेतन उईके माधुरी मेश्राम प्रियंका रामटेके जितू कोहाडकर शंकर पौनिकर भारत सोनटक्के कृष्णा कुंभरे धनराज धानगाये टीकाराम मातवारे मोरेष सुर्यवंशी जीवन आकरे के.एस.रहांगडाले नरेंद्र आगाशे राजू गुन्नेवार विजय पारधी यांनी विशेष सहकार्य केले.

error: Content is protected !!