Monday, May 12, 2025
गोंदिया

गोंदिया येथे भव्य सत्कार समारंभ आणि शिक्षक मेळावा संपन्न

गोंदिया – 2/3/2025 – प्राथमिक शिक्षक संघाचा आमदार व नवनिर्वाचित जिल्हा परिषद पदाधीकाऱ्यांचा  ऐतिहासिक सत्कार सोहळा व भव्य शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न झाला. गोंदिया संघाच्या मेळाव्याचे शिक्षकांचे पंचप्राण संभाजीराव थोरात(तात्या) साहेबांनी केले भरभरून कौतुक; जिल्हास्तरीय असा सोहळा होणे नाही,राज्य समन्वयक मधुकरराव काठोळे यांची स्पष्टोक्ती.

जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामभाऊ भेंडारकर, माजी सामाजिक न्याय मंत्री तथा आमदार राजकुमारजी बडोले, आमदार विजयभाऊ रहांगडाले आमदार विनोद भाऊ अग्रवाल आमदार संजय भाऊ पुराम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष व शिक्षण सभापती सुरेश भाऊ हर्षे, जिल्हा परिषद गोंदियाचे माजी अध्यक्ष पंकजभाऊ रहांगडाले समाजकल्याण सभापती रजनीताई कुंभरे, सभापती पशु व कृषी संवर्धन दिपाताई चंद्रिकापुरे यांनी गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाला सदैव मदतीचा हात देण्याचे अभिवचन दिल्याबद्दल शिक्षक संघाच्या वतीने आभार _ किशोर बावनकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदिया.

गोंदिया शिक्षण क्षेत्रासंबंधीत घटकाच्या अडचणी लोकप्रतिनिधीद्वारे शासन दरबारी मांडून त्याची सोडवणूक करणारी राज्यातील एकमेव संघटना म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती असलेल्या प्राथमिक शिक्षक संघाचा सत्कार सोहळा व भव्य शिक्षक मेळावा (एक मार्च)डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे हजारो शिक्षक_ शिक्षिकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले, शिक्षकांना कालबद्ध वेतनश्रेणीचा १०,२०,३० चा टप्पा लागू करणे व शिक्षण सेवक योजना रद्द करणे, शिक्षण सेवक कालावधीत स्व;जिल्ह्यात बदली करणे करिता शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार विनोद अग्रवाल यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमाचे उद्घाटक राज्य नेते संभाजीराव थोरात व अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक संघाचे राज्यध्यक्ष काठोळे हे होते. शिक्षकांचे पंचप्राण थोरात यांनी सध्याच्या काळात शासनाने जिल्हा परिषद शाळेकडे व शिक्षकांकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असून आधुनिक राष्ट्र घडवण्यामध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे, अशैक्षणिक कामाचे ओझे बाजूला सारून शिक्षक आपल्या परीने उत्तम कार्य करत असल्याचे त्यांनी आपल्या उद्घाटनिय मार्गदर्शनातून सांगितले.

सत्कारमूर्ती गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर ,माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले, आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले ,आमदार संजय पुराम, जि.प.चे उपाध्यक्ष सुरेश हर्षे, जि. प. माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले ,सभापती रजनीताई कुंभरे , सभापती दीपाताई चंद्रिकापुरे,सभापती मुनेश रहांगडाले यांचा या कार्यक्रमादरम्यान शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सर्व सत्कारमूर्तींनी जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या शाळांचा व शिक्षकांचा अभिमान असल्याचे गौरव उद्गगार काढले. जिल्ह्यामध्ये शिक्षक करत असलेल्या कार्याची आम्हाला जाण आहे तसेच त्यांना उद्भवणाऱ्या समस्येचे देखील आम्ही शासन स्तरावर मांडून सोडवण्याचा प्रयत्न करत असून सदैव शिक्षकांच्या पाठीशी असल्याचे सत्कारमूर्तींनी यावेळी आपल्या मनोगतातून सांगितले, या प्रसंगी गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भेडारकर, माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले, आमदार विजय रहांगडाले,आमदार विनोद अग्रवाल, आमदार संजय पुराम,उपाध्यक्ष सुरेश हर्षे,माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले ,जिल्हा परिषद सभापती रजनी कुंभरे, सभापती मुनेश रहांगडाले यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे विशेष अतिथी संघटनेचे राष्ट्रीय संघटक नूतन बांगरे,राज्य उपाध्यक्ष उमाशंकर पारधी, राज्य उपाध्यक्ष आयुब खान, विभागीय अध्यक्ष केदार गोटेफोडे,राज्य सदस्य अनिरुद्ध मेश्राम हे होते.

यावेळी शिक्षिकाकरिता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यासाठी जिल्ह्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे संचालन यशोधरा सोनवणे, यशवंती लिखार, नीतू डहाट यांनी केले याकरिता शिक्षक संघ महिला जिल्हा आघाडी गोंदिया सर्व तालुका महिला आघाडी पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांनी आपले खास शैलीतून नवीन संच मान्यता मान्यतेचे भविष्यात होणारे दुष्परिणामामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा वाचविण्याकरता व हा संच मान्यतेचा शासन निर्णय कायमचा रद्द करणे काळाची गरज असल्याचे सत्कारमूर्तींना साकडे घातले तसेच शिक्षण सेवक योजना काळ प्रासंगिक होती ती रद्द करणे तसेच या महागाईच्या काळात मानधन चाळीस हजार करणे व शिक्षण सेवक कालावधीत कोणत्याही प्रकारची अट न ठेवता स्व:जिल्ह्यात बदली करणे यासह नवनियुक्त शिक्षण सेवकांच्या समस्येचा पाढा वाचून याकडे सत्कारमूर्तीं आमदार महोदय यांचे लक्ष वेधले, जिल्ह्यातील वजनदार लोकप्रतिनिधी शिक्षक संघाच्या पाठीशी असल्याचा आम्हाला अभिमानअसल्याचे यावेळी आपल्या प्रस्ताविकेतून बावनकर यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष हेमंत पटले,विनोद लिचडे व तालुकाध्यक्ष कैलास हांडगे यांनी केले तर उपस्थित यांचे आभार जिल्हा सचिव अरविंद उके यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य, जिल्हा, तालुका पदाधिकारी तसेच महिला आघाडी पदाधिकारी आणि संघटना प्रेमी शिक्षकांनी अहोरात्र परिश्रम घेतले.

error: Content is protected !!