Monday, May 12, 2025
सड़क अर्जुनी

सडक अर्जुनी – महसूल विभागाची धाड; शेकडो ब्रास रेती साठा जप्त

चूलबंद नदी रेती घाटावरून सुरू होता अवैध उपसा : रेतीचा करून ठेवला साठा

संग्रहित foto
संग्रहित फोटो

सडक अर्जुनी : सडक अर्जुनी तालुक्यातील चूलबंद नदी पात्रातून जेसीबी लावून रेतीचा मोठ्या प्रमाणात अवैध उपसा केला जात होता, तसेच उपसा केलेली रेती लगतच्या शेतामधून साठवून त्याची विल्हेवाट लावली जात होती. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. शुक्रवारी (दि.७) ला जिल्हा खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून साठवून ठेवलेला शेकडो ब्रास रेतीचा साठा जप्त केला. महसूल विभागाने केलेल्या या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले. सडक अर्जुनी तालुक्यातून वाहणाऱ्या चूलबंद शशीकरण नदीपात्रात बांधकाम करण्यायोग्य मुबलक रेतीसाठा असल्याने नदीवरील पिपरी/ राका, पळसगाव, सौंदड, फुटाळा,घाटबोरी तेली, कोदामेडी, सावंगी या रेतीघाटावर रेती डेपो तयार सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

मात्र नव्या रेती धोरणानुसार मागील दोन वर्षापासून एकही वाळू डेपो सुरू झाला नाही. घरकुल बांधकाम व इतर पायाभूत सोईसुविधा उभारण्यासाठी लागणाऱ्या रेतीची मागणी लक्षात घेता रेती तस्करांनी अवैध मार्गाने रेतीचा उपसा करून त्याची साठवणूक करण्याचा जणू सपाटा लावला आहे. रेती माफियांनी रेती घाट पोखरून टाकले. रेती साठा शिल्लक न राहिल्यास रेती डेपोचे कंत्राट रद्द होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. जिल्हा खनिकर्म विभागाला याची माहिती प्राप्त होताच त्यांनी शुक्रवारी धाड टाकून शेकडो ब्रास साठवून ठेवलेला रेती साठा जप्त केला.

महसूल विभागाने धाड टाकून पळसगाव,सौंदड, राका येथून शासकीय व खाजगी जमिनीवर साठवून ठेवलेला रेतीचा साठा जप्त केला; पण जप्त केलेल्या रेती साठ्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलीच उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे याची चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा रेतीसाठा शासकीय रेती डेपोमध्ये जमा करावा,अथवा रॉयल्टीच्या माध्यमातून गरजू घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.

जप्त केलेली रेती चोरी होण्याची शक्यता महसूल विभागाने रेतीसाठा साठा जप्त केला असला तरी अनेक ठिकाणी रेतीसाठा असल्याने व त्यावर प्रत्यक्ष पणे देखरेख नसल्याने जप्त केलेली रेती चोरी होण्याची शक्यता  आहे.

error: Content is protected !!