नगर पंचायत सडक अर्जुनी मध्ये होत असलेले नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे!!?
नगर पंचायत सडक अर्जुनी मध्ये होत असलेले नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे!!?
सडक अर्जुनी – नगरपंचायत सडक अर्जुनी मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग द्वारे सध्या वॉर्ड क्रमांक 5 येथे नाली बांधकाम सुरू आहे. परंतु त्या बांधकामाचे कोणतेही फलक लावण्यात आले नाही. जनतेच्या माहिती करिता कामाचे फलक कामे सुरू करताना लावायला पाहिजे कारण कुठली योजना निधी, कोणते कामे,किती रुपयाचे आहे,कंत्राटदार कोण आहे,कामाचा कालावधी किती, कुटून कुठपर्यंत इतर माहिती कामाच्या जागी नागरिकांच्या माहिती करिता फलकावर असणे जरुरी आहे. परंतु जाणून पूर्वक हे कामाचे माहिती फलक कामे झाल्यावर लावल्या जातात.
प्राप्त माहिती नुसार गोंदिया येथील एका कंत्राटदारला सडक अर्जुनी नगरपंचायत हद्दीतील आमदार निधी चे करोडो रुपयाचे रोड, नाली बांधकामाचे टेंडर असल्याचे सांगितले जाते.
कोणतेही बांधकाम करीत असताना इस्टिमेट तयार केले जाते आणि त्या इस्टिमेट अनुसारच ते बांधकाम करणे अनिवार्य आहे. परंतु सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग (कार्यालय सावंगी) द्वारे नगरपंचायत सडक अर्जुनी मध्ये वॉर्ड क्रमांक 5 मध्ये होत असलेल्या नाली बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे नागरिकांत चर्चा आहे.
शासन करोडो रुपये निधी जन सुविधे करीता लोकांच्या हितासाठी विकास कार्यासाठी देत असते परंतु जास्त नफा मिळविण्यासाठी निकृष्ट दर्जाचे काम केले जातात.
सांगायचे तात्पर्य म्हणजे mkm news 24 ने नगरपंचायत सडक अर्जुनी येथील वॉर्ड क्रमांक 5 मध्ये होत असलेल्या नाली बांधकाम जागेवर जाऊन कामाचे देखरेख करणाऱ्या कंत्राटदाराचे प्रतिनिधी यांना नाली बांधकाम विषय चौकशी केली असता त्यांनी सदर नाली बांधकाम हा नगरपंचायत चे नसून हे सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत करीत असल्याचे सांगितले.
आपणाला फोटो मध्ये दिसत असल्या प्रमाणे होत असलेल्या नालीच्या बांधकामा विषय विचारले असता त्यांनी सांगितले की, PWD कार्यालयाचे अधिकारी नेहमी पाहणी करीत येत असतात. ते सांगतील तसे काम आम्ही करीत आहोत. तर परिसरातील नागरिक सांगतात की, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे कंत्राटदार आपल्या मनमर्जीने कामे करतो त्यामुळे कामे निकृष्ट होत आहेत.
तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजी. एम.खोब्रागडे यांना फोन करून सदर कामा बद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की मी स्वतः जाऊन कामाची पाहणी करतो आणि कामे हे नियम बाह्य होत असल्याचे दिसून आल्यास कामाचे बिले काढणार नाहीत. कंत्राटदार कोणीही असो नियमा प्रमाणे कामे करावी लागणार शासनाचा निधी योग्य रित्या वापर केला जाहील.
मात्र आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे वतीने चौकशी करून काय निर्णय घेतो याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.