Saturday, August 23, 2025
गोंदिया

गोंदिया जिल्ह्यातील आणीबाणी काळात लढा देणाऱ्यांचा व्यक्तींचा सन्मान

•गोंदिया जिल्ह्यातील आणीबाणी काळात लढा देणाऱ्यांचा व्यक्तींचा सन्मान

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन गौरव

•जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते सन्मान सोहळा संपन्न

गोंदिया,दि.25: दिनांक 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या काळात देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या आणि त्या संघर्षात तुरुंगवास भोगलेल्या नागरिकांचा आज सन्मान करण्यात आला. नवीन प्रशासकीय इमारत जयस्तंभ चौक येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते हा गौरव सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या संघर्षयात्रींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी त्यांचा गौरव केला. यावेळी काही वयोवृद्ध लढवय्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या आसनस्थळी जाऊन सन्मानित केले.

या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बहिरे, तहसीलदार समशेर पठाण, अप्पर तहसीलदार श्रीकांत कांबळे उपजिल्हाधिकारी शुभम पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे तसेच जिल्ह्यातील विविध संघर्ष सैनिक व त्यांच्या वारसदारांची उपस्थिती होती.

कार्यक्रमात सन्मानपत्र आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून शोभेलाल आत्माराम बोपचे, बेनीराम हरिराम कटकवार, कुशीलाल उकाजी रहांगडाले, बुधराम झाडू काटेखाये, साधुराम भिवराम ठाकरे, भैयालाल बिसनजी मानकर, हरीराम मोतीराम करंडे, घनश्याम भागवत डोये, गोवींदराव रामलाल पुंडे, गोपीचंद दादुजी पटले, नारायन केशरीचंद कटकवार, सुधाकर देवराव रानडे, धनलाल हिरूद उईके, घनश्याम उदयराम अग्रवाल, राम दिनकरराव टोळ, त्रिलोकीनाथ शिवदत्त शर्मा, भगीरथ छोटेलाल यादव, मधुकर विठलराव ढोके, इंद्रराज ताराचंद ठाकुर, मधुकर मनाजी दुनेदार, संभु आडकु नाकाडे यांचा गौरव करण्यात आला.

error: Content is protected !!