काही शिक्षक सोशल मीडियावर जास्तच सक्रिय! अजी.. गुरुजी शाळेत जाता की,नाही? का बस…
सडक अर्जुनी – (सुशील लाडे) – मुलांचे भवितव्य घडविणे हे शिक्षकांच्या हातात असते. एखादे घर तयार करताना ज्या प्रमाणे त्याचा पाया हा मजबूत तयार करावा लागतो त्याच प्रमाणे प्राथमिक शिक्षण देताना विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया हा मजबूत बनविणे हे शिक्षकाच्या हातात असते. आणि त्याकरिता शासन शिक्षकांना भरगच्च पगारही देतो. मात्र काही शिक्षक शाळेच्या वेळेस सध्या सोशल मीडियावरच सक्रीय असून बाहेर फिरत असल्याचे दिसत असतात.

प्रश्न हा निर्माण झाला आहे की, शिक्षण विभागाशी संबंधित अधिकारी ह्या कडे पूर्ण ताकतीने लक्ष का देत नाही.
दुसरा प्रश्न हा आहे की, ज्या शाळेतील शिक्षक नियमा प्रमाणे सेवा देत नसतील तर त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक वर्ग हा मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून तक्रार का करीत नाही.
सूत्राद्वारे प्राप्त झालेल्या माहिती नुसार जी. प .गोंदिया चे शिक्षण विभाग (प्राथमिक), शिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील काही शाळेला भेटी दिल्या असता त्यांना अनियमितता त्यांच्या निदर्शनात आल्या होत्या.
त्यात १)शाळा भेटी दरम्यान शिक्षक/(मुख्याध्यापक) शाळेत हजरच नव्हते. २)शाळेत उपलब्ध जनरल रजिष्टरमध्ये 2017-18 पर्यंतच्या नोंदी घेण्यात आलेल्या आहेत, त्यानंतरच्या नोंदी आढळून येत नाहीत. ३) विद्यार्थी हजेरी पत्रक रजिष्टर 2024 पासून उपलब्ध असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गोषवारे आढळून येत नाहीत. ४) शाळा व्यवस्थापन समिती रजिष्टरमध्ये फक्त प्रजासत्ताक, स्वातंत्र्य दिन व शाळाप्रवेशोत्सव याबाबतच्याच नोंदी असून शाळा व्यवस्थापन समितीची मासिक सभा घेण्यात येत नसल्याचे आढळून येते. ५)शालेय पोषण आहार रजिष्टर अपूर्ण असून चव रजिष्टर नाही. ६)शाळा भेट रजिष्टर प्रमाणित करण्यात आले नसून सप्टेंबर 2024 पासून फक्त फेब्रुवारी 2025 पर्यंतच्या नोंदी आहेत. ७)शाळेत विद्युत आहे परंतु विद्युत देयक भरले नसल्याने विद्युत कपात झाल्याचे सांगण्यात आले. ८)इयता 3 री व 4 थी मध्ये फक्त 10 विद्यार्थी असून त्या विद्यार्थ्यांना भाषेत अस्खलित वाचन व लेखन करता येत नाही. त्याचप्रमाणे गणितीय क्रिया व 3 अंकी क्रमांक लिहिता येत नाहीत. ९) विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका चुकीच्या तपासल्याचे निदर्शनास आले. १०) शैक्षणिक सत्र 2024-25 च्या संच मान्यते मध्ये आपल्या शाळेची संचमान्यता शून्य (0) दाखविण्यात आलेली आहे.
यावरून असे निदर्शनास येत कि, संबंधित शिक्षकाचे शाळेकडे दुर्लक्ष असून याचा परिणाम शाळेवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. करिता वरील मुद्यांना अनुसरून आपले काय म्हणणे आहे? याबाबतचा खुलासा सादर करावा असे शिक्षणाधिकारी यांनी संबंधित शिक्षकाला (मुख्याध्यापकाला) मागितला होता असे सुत्रांनी सांगितले आहे.
मात्र तालुक्यातील नागरिकांत आता जोरदार चर्चा सुरू आहे की,जे शिक्षक शाळेच्या दिवशी शाळेत पूर्ण सेवा न देता शाळेच्या वेळेत बाहेर फिरत असतात, आपले खाजगी कामे करीत असतात किंवा फक्त सोशल मीडियावरच सक्रिय असतात किंवा कोणतेही पूर्व सूचना न देता शाळेतून निघून जातात त्यांची जिल्हा परिषद कडून सखोल चौकशी करून कारवाही करण्याची मागणी आता पालक वर्ग आणि सुजान नागरिक करीत आहेत.