शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. – आमदार राजकुमार बडोले
सडक अर्जुनी (दि. ०७ ऑगस्ट २०२५) –भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या जयंतीनिमित्त तहसील कार्यालय सभागृह, सडक अर्जुनी येथे शाश्वत शेती दिन आणि कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा बैठक आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली.
या बैठकीत आमदार बडोले यांनी शाश्वत व पर्यावरणपूरक शेती पद्धतींचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, शाश्वत शेती ही शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग आहे. त्यामुळे शासनाच्या कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे ही काळाची गरज आहे.

या कार्यक्रमात शाश्वत शेती, नवे कृषी तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांसाठी लाभदायक योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर तालुकास्तरीय योजनांची स्थिती, अंमलबजावणीतील अडचणी, लाभार्थ्यांची संख्या आदी मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
या कार्यक्रमात पंचायत समितीचे सभापती चेतन वळगाये, जिल्हा कृषी अधिकारी निलेश कनवळे, तहसीलदार इंद्रायणी गोमासे, उपसभापती निशा काशीवार, कृ.ऊ.बा.स. चे सभापती डॉ. अविनाश काशिवार, जि.प. सदस्य कविता रंगारी, सुधा रहांगडाले, शालिंदर कापगते, शिवाजी गहाणे, वर्षा शहारे, दिपाली मेश्राम, सपना नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी रुपेश मेश्राम, तालुका कृषी अधिकारी लांजेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे तसेच ग्रामपंचायतचे सरपंच व अधिकारी उपस्थित होते.