Saturday, August 23, 2025
सड़क अर्जुनी

आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते विविध ठिकाणी ध्वजारोहण संपन्न

सडक अर्जुनी, दि. 15 ऑगस्ट 2025 – आज भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी येथे विविध ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, जनसंपर्क कार्यालय तसेच गिऱ्हेपुंजे पब्लिक स्कूल या ठिकाणी आमदार बडोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन देशभक्ती, ऐक्य आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन करण्यात आले.

या प्रसंगी विविध ठिकाणी स्थानिक पदाधिकारी, शिक्षकवर्ग, नागरिक तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमांदरम्यान राष्ट्रीय ध्वजाला सलामी देऊन शहीदांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली.

error: Content is protected !!