Saturday, August 23, 2025
गोंदियादिल्ली

भाऊसाहेब बोरा मतीमंद निवासी विद्यालय सावरी येथे स्वातंत्र्य दिन साजरा

गोंदिया /सावरी – आज दि. १५/०८/२०२५ रोज शुक्रवारला भाऊसाहेब बोरा मतीमंद निवासी विद्यालय सावरी येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. अनिकेत बडोले, संस्थेचे सचिव माननीय श्री. प्रशांत शहारे, संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. भारत शहारे, विद्यालयाची मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली वैद्य यांनी प्रतिमेचे पूजन केले.

ध्वजारोहण करून राष्ट्रगीत घेण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले. विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतांवर नृत्य सादर केले. याप्रसंगी लिपिक मनीष साखरे, क्रीडा शिक्षक अर्जुन पटले, रोहित नंदेश्वर, कुणाल बडोले, सायली वैद्य, शिल्पा शहारे, काजल रंगारी, अविनाश गजभिये, संतोष गावंडे, अमित जांभूळकर, सुनिता रामटेके, सरिता मेश्राम इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!