Saturday, August 23, 2025
सड़क अर्जुनी

ग्रा.पं. कोदामेडी अंतर्गत जि. प.शाळा, अंगणवाडी व दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप

सडक अर्जुनी – तालुक्यातील गट ग्रामपंचायत कोदामेडी अंतर्गत 15 व्या वित्त आयोग निधीतून केसलवाडा व कोदामेडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संगणक संच, व कलर प्रिंटर तसेच कोडीमेडी येथील अंगणवाडी क्रमांक 1 व अंगणवाडी क्रमांक 2 येथील सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश , क्रीडा साहित्य व ड्रायफूड वितरित करण्यात आले .तसेच केसलवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सुद्धा संगणक संच व कलर प्रिंटर वितरित करण्यात आले. याशिवाय केसलवाडा येथील अंगणवाडीतील शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा शालेय गणवेश, क्रीडा साहित्य व ड्राय फूड वितरित करण्यात आले असून. ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोदामेडी व केसलवाडा येथील सर्व दिव्यांग व्यक्तींना जीवनोपयोगी साहित्याचे वाटप स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आले.

यावेळी सरपंच विनोद पुसाम, उपसरपंच निशांत राऊत, ग्रामपंचायत अधिकारी आर. एम. बोरकर, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण भिवगडे,अंजुम खान, रामदास भिवगडे, रोशनी शेलारे, कामिनी चांदेवार, सुलोचना मुनिश्वर, कुसुम तरोने, तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक, अंगणवाडीतील शिक्षिका, मदतनीस , व ग्रामपंचायतचे कर्मचारी पालक ,विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!