ईटियाडोह प्रकल्पस्थळी सोयीसुविधा उभारण्यावर भर:-आमदार राजकुमार बडोले
अर्जुनी-मोर.(सुरेंद्रकुमार ठवरे )-इटियाडोह प्रकल्प हा गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोर.तालुक्यातील जलस्रोताचा एक मोठा आधार आहे. दरवर्षी पावसाळ्यात धरण ओसांडून वाहते आणि पाण्याचा लाभ शेती व इतर विविध गरजांसाठी मिळतो. हा प्रकल्प केवळ शेतीपुरता मर्यादित नसून पर्यटनाच्या दृष्टीनेही तो अत्यंत आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. ओव्हरफ्लो झालेला धरण परिसर पर्यटकांसाठी निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्याचे ठिकाण ठरतो.या प्रकल्पस्थळी बोटींग व्यवस्थेसह ईतरही सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर आपला भर असणार आहे.ईटियाडोह प्रकल्पातून भंडारा,गोंदिया,गडचिरोली जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला सिंचन होतो.या प्रकल्पातील पाटचा-या,कालवे,व पुलीये अत्यंत पुरातन असुन जिर्ण अवस्थेत आले आहेत.त्यांचे दुरुस्तीसाठी व जीर्णोद्धारासाठी शासनस्तरावर आपले प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन आमदार राजकुमार बडोले यांनी केले आहे.
अर्जुनी-मोर. तालुक्यातील इटियाडोह प्रकल्पाच्या जल पूजनाचा शासकीय सोहळा आज 22 आॅगस्ट रोजी आमदार राजकुमार बडोले यांचे हस्ते जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी विश्रामगृहात झालेल्या छोटे खानी सभेत आमदार राजकुमार बडोले बोलत होते.यावेळी शेतक-यांच्या सुख सुविधेसाठी व भरपुर उत्पन्नासाठी आमदार बडोले यांनी वरुणराजाकडे साकडे घातले.
आजच्या जलपूजन प्रसंगी निसर्गाची ही अनमोल देणगी अनुभवण्याची अनेकांना संधी लाभली. परिसरातील नागरिक व उपस्थित मान्यवर यांच्या सहवासात हा क्षण अविस्मरणीय ठरला. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा प्रकल्प अधिक सक्षम, सुरक्षित आणि भावी पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास आमदार बडोले यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी पाणी वाटप समिती अध्यक्ष शिवनारायण पालीवाल, पंचायत समिती सभापती आम्रपालीताई डोंगरवार, जि.प उपाध्यक्ष तथा सदस्य यशवंत गणवीर, उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे, तहसिलदार अनिरुद्ध कांबळे, कार्यकारी अभियंता बाघ इटियाडोह सोनाली सोनुले, उपविभागीय अभियंता समीर बनसोड, माजी जि.प सदस्य किशोर तरोणे, रतिराम राणे, गोठणगाव संरपच संजय ईश्वार, प्रतापगड संरपच भोजु लोगडे, पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे, तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, राजहंस ढोके, विजय कापगते, संजय खरवडे, किशोर ब्राम्हणकर, पराग कापगते, मिथुन टेंभुर्णे, शुशीलाताई हलमारे, त्र्यंबक बेहरे सह पदाधिकारी तथा ईटियाडोह पाटबंधारे विभागाचे अधिकारी ,कर्मचारी,पर्यटक व ग्रामस्थ उपस्थित होते.