दरेकसा दलमच्या ३ माओवाद्यांचे गोंदिया पोलिसासमोर आत्मसमर्पण
गोंदिया,दि.१३ः जिल्ह्यातून माओवाद चळवळ अखेरच्या वाटेवर असून आज(दि.१३)शनिवारला दरेंकसा दलमच्या ३ माओवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.यामध्ये रोशन ऊर्फ मारा इरिया वेडजा कमांडर दर्रेकसा एरिया कमेटी, सुभाष एसीएम, रतन एसीएम असे ०३ माओवाद्यांनी अग्निशस्त्रांसह माओवादी गणवेशात गोंदिया पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांच्या समक्ष आत्मसमर्पण केले.यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकत्रितपणे २० लक्ष रुपयांचे बक्षिस जाहिर केले होते. 
महाराष्ट्र सरकारच्या आत्मसर्मण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जिवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवादयांनी आधीच पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे.२८ नोव्हेंबर रोजी एम.एम.सी. झोन मधील स्पेशल झोनल कमेटी मेंबर विकास उर्फ अनिल उर्फ नवज्योत नागपूरे, ऊर्फ रमेश सायन्ना भाष्कर लिंगव्या रामास्वामी याचेसह एकुण ११ जहाल माओवाद्यांनी गोंदिया पोलीस समक्ष आत्मसमर्पण केले होते.त्यापैकी दरेंकसा एरिया कमेटीचे उर्वरीत काही माओवादी सदस्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी गोंदिया पोलिसांच्यावतीने प्रयत्न सुरु होते.अखेर आज १३ डिसेंबरला एम.एम.सी. झोन मधील दरेकसा एरिया कमेटी कमांडर रोशन याचेसह ०३ जहाल माओवाद्यांनी गोंदिया पोलीस दलासमक्ष आत्मसमर्पण केले. 
आत्मसमर्पित माओवादी कमांडर दर्रेकसा एरिया कमेटी रोशन ऊर्फ मारा इरिया वेडजा,(वय ३५,रा.मेंढरी, ता.जि. बिजापुर,छ.ग) याने SLR, मॅग्झीन-०२,राऊंड- २५ सह आत्मसमर्पण केले.याच्यावर ८ लाखाचे बक्षिस होते.एसीएम सदस्य सुभाष ऊर्फ पोज्जा बंडु रव्वा,(वय २६,रा.येरापल्ली,पो.पामेड,ता.उसुर,जि. बिजापुर, छ.ग.)SLR,मॅग्झीन- ०२,२३ राऊंड सह आत्मसमर्पण केले असून ६ लाखाचे बक्षिस होते.तिसरा माओवादी रतन ऊर्फ मनकु ओमा पोयम पोयाम)वय २५,रा. रेखापाल,पोस्ट ओरचा,ता.जि.नारायणपुर,छ.ग)याने 8 mm बंदुक,मॅग्झीन- ०१ व राऊंड १५ सह आत्मसमर्पण केले असून याच्यावर ६ लाखाचे बक्षिस होते.
