पदवीधर निवडणुकीत आमदार राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी येथे बजावला मतदानाचा हक्क
अर्जुनी-मोर विधान सभा मध्ये महायुतीचे उमेदवार सुधाकरराव कोहळे यांना मोठ्या संख्येने मते मिळणार – आमदार राजकुमार बडोले
सडक अर्जुनी – महाराष्ट्र विधान परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्जुनी-मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी आज तहसील कार्यालय, सडक अर्जुनी येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.

आमदार राजकुमार बडोले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असून, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सुधाकर कोहळे हे महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

मतदानानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार राजकुमार बडोले म्हणाले की, अर्जुनी-मोर विधानसभा क्षेत्रातील सडक अर्जुनी, अर्जुनी-मोर आणि गोरेगाव या तीनही तालुक्यांतून महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना मोठ्या संख्येने मते मिळतील, अशी अपेक्षा आहे.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, पदवीधर मतदारांच्या मतदानातून कोणाला कौल मिळतो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
