Monday, November 16, 2026
सड़क अर्जुनी

लोहिया विद्यालयात 14 नोव्हेंबर बालक दिन तसेच 15 नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

सौंदड : येथील लोहिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय तसेच जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने १४ नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालक दिन म्हणून, तर १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने, संस्थेचे सचिव मा. पंकज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यालयाच्या प्राचार्या उमा बाच्छल यांच्या अध्यक्षतेखाली हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

बालक दिनानिमित्त प्राचार्या उमा बाच्छल यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी शिक्षक टी. बी. सातकर, एम. एम. कापगते व आर. ए. वैद्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शिक्षक व्ही. पी. भेंडारकर यांनी केले.

तसेच १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक जी. एस. कावळे, शिक्षक टी. बी. सातकर, डी. आर. दिघोरे, एस. यू. पवार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांचे बालप्रेम तसेच भगवान बिरसा मुंडा यांचे आदिवासी समाजाच्या हक्कांसाठीचे संघर्षमय योगदान यांची माहिती देण्यात आली.