Sunday, August 16, 2026
सड़क अर्जुनी

सडक अर्जुनी नगरपंचायत सार्वजनिक ध्वजारोहण सोहळा थाटात संपन्न

सुशिल लाडे….

सडक अर्जुनी : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या वतीने सार्वजनिक ध्वजारोहण सोहळा उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नगरपंचायत कार्यालयाच्या वतीने दुर्गा चौक, सडक अर्जुनी येथील सार्वजनिक ध्वजाच्या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष तेजराम किसन मडावी यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी राष्ट्रगीत गायले. स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाला नगरपंचायतीचे उपाध्यक्ष,सभापती, नगरसेवक, मुख्याधिकारी सारंग सुरेश खांडेकर, प्रशासकीय अधिकारी युगलकुमार दडमल, नगरवाशी, शालेय विद्यार्थी, यांच्यासह नगरपंचायतीचे सर्व अधिकारी, कर्मचारी वृंद  उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत परिसरासह दुर्गा चौक परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!