Sunday, August 16, 2026
मराठवाड़ामहाराष्ट्र

“एक वृक्ष शहीद के नाम, हरियाली से करें राष्ट्र को सलाम”

छत्रपतीसंभाजीनगर – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायीक सुरक्षा परिषद संघटनेतर्फे आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी नेहरू उद्यान, छावणी कॅन्टोन्मेंट एरिया, छत्रपती संभाजी नगर येथे राष्ट्रीय वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.

या अभियानांतर्गत “एक वृक्ष शहीद के नाम, हरियाली से करे राष्ट्र को सलाम” या राष्ट्रप्रेम व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या घोषवाक्यासह वृक्षारोपण करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इंद्रजीतसिंहजी, राष्ट्रीय अध्यक्ष हौशीला प्रसाद दुबे जी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष कुलदीपसिंह जी आणि राष्ट्रीय महासचिव शेख रशीद रहिमान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी संघटनेचे पदाधिकारी, सभासद, नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरणाचे संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि भावी पिढीसाठी हरित व निरोगी पर्यावरण निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

शहीदांच्या बलिदानाला वृक्षारोपणाच्या माध्यमातून मानवंदना देत “वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरण वाचवा” असा संदेश यावेळी उपस्थितांना देण्यात आला.

 

शेख रशीद रहिमान

राष्ट्रीय महासचिव,

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायीक सुरक्षा परिषद

छत्रपती संभाजी नगर

error: Content is protected !!