Wednesday, January 28, 2026
सड़क अर्जुनी

आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या वाढदिवसाच्या औचीत्याने रुग्णालयात फळ वितरण

सडक अर्जुनी -01/03/2023- अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा वाढदिवस आज ता.1 मार्च ला कोहमारा येथील एरिया 51 येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत फळ वाटप करण्यात आले.

तर एरिया 51 येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त केक काटून दिवस उत्साहात साजरा करण्यात आला .याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, नगरपंचायत उपाध्यक्ष वंदनाताई डोंगरवार, पत्रकार बिरला गणवीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. अविनाश काशीवार, सडक अर्जुनी चे नगराध्यक्ष तेजराम मडावी, नगरपंचायत सभापती साहिस्ता शेख, दीक्षा भगत, पंचायत समिती सदस्य डॉ. रुखी राम वाढई, नगरसेविका शशिकला टेंभुर्णे, कामिनी कोवे,, डॉ. सुगत चंद्रिकापुरे, राकेश जयस्वाल,आशिष पेरणे, शालिकराम कापगते, एफ आर टी शहा, कृष्णा ठलाल, प्रमोद लांजेवार, उमराव मांढरे, चंद्रकुमार बहेकार,  शुभांगी वाढवे, छाया टेकाम, अतुल फुले, पुष्पमाला बडोले, अनिता बांबोर्डे, रेखा कोसलकर, मुन्ना देशपांडे, मधु हर्षे, यांचे सह तालुक्यातील पत्रकार बंधू उपस्थित होते

error: Content is protected !!