Tuesday, May 13, 2025
सड़क अर्जुनी

रामनवमी उत्सव निम्मित पोलिसांचे पथसंचलन आणि दंगा काबु योजना रंगीत तालीम

सडक अर्जुनी – MKM NEWS 24 –
पोलीस स्टेशन डुग्गीपार अंतर्गत आज दिनांक 29 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता रामनवमी उत्सव निम्मित पथसंचलन करण्यात आले. सडक अर्जुनी शहरात रामनवमी उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. संपूर्ण नगरामध्ये शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असून कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून डूग्गिपार पोलीस स्टेशन मार्फत आज 29 मार्च रोजी दंगा काबु योजना रंगीत तालीम घेण्यात आली .

तसेच सड़क अर्जुनी येथे पथसंचलन करण्यात आले. सदर पथसंचलना मध्ये मा. भिसे साहेब Sdpo आमगाव, पोलीस स्टेशन चे ठाणेदार आर.सिंगंनझुडे , सहा.पो.नी.प्रमोद बांबोर्डे , 28 अंमलदार, उप मुख्यालय व पो स्टे. देवरीचे 18 अंमलदार असे एकूण 03 अधिकारी 46 पोलीस अंमलदार हजर होते.

error: Content is protected !!