दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आमगाव, तिरोडा, सालेकसा तालुक्यात जनजागृती मोहीम
गोंदिया, दि. २८ ऑक्टोबर २०२६ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया यांच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने आज दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी आमगाव तालुक्यात भ्रष्टाचारविरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. 
या मोहिमेदरम्यान आमगाव, सालेकसा व तिरोडा तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन कार्यालयांच्या दर्शनी भागात भ्रष्टाचारविरोधी जनजागृतीपर भित्तिपत्रके लावण्यात आली. तसेच नागरिकांना भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम, लाच देणे व लाच घेणे हा कायद्याने गुन्हा असल्याबाबत आणि भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार करण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली. 
तसेच रावणवाड़ी कामठा येथील आठवडी बाजाराला भेट देऊन तेथे उपस्थित नागरिक व व्यापाऱ्यांना भ्रष्टाचारविरोधी जनजागृतीपर पत्रकांचे (पॅम्प्लेट्स) वाटप करण्यात आले. शासकीय कामकाजाच्या अनुषंगाने कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले. 
दक्षता जनजागृती सप्ताहाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराविरोधात जागरूकता निर्माण करणे, शासकीय कामकाजात पारदर्शकता व प्रामाणिकपणा वाढविणे आणि भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी जनतेचा सक्रिय सहभाग मिळविणे हा आहे.
नागरिकांसाठी संपर्क क्रमांक
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया यांच्यातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाच देऊ नका, लाच घेऊ नका. कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करीत असल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा.
* टोल फ्री क्रमांक : १०६४
* कार्यालयीन दूरध्वनी : ०७१८२-२५१२०३
* पोलीस उपअधीक्षक श्री नीलेश लोधी
7620383888
* पोलीस निरीक्षक श्री. उमाकांत उगले : ९६६४९५९०९०
* पोलीस निरीक्षक श्री. अरविंद राऊत : ८२७५२९८४७५
* ई-मेल : acbgondia@gmail.com
कार्यालयाचा पत्ता : पोलीस उपअधीक्षक कार्यालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बालाघाट चौक ते तिरोडा रोड, रेल्वे चौकीच्या बाजूला, गोंदिया.
— लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया
