Tuesday, April 28, 2026
सड़क अर्जुनी

रेती तस्करांची वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याशी धक्काबुक्की

सडक अर्जुनी : कोसमतोंडी सहवनक्षेत्रात गस्तीदरम्यान अवैध वाळू वाहतूक करताना आढळलेल्या काही आरोपींनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याशी धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी आरोपींविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने हे ४ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ५.३०वाजता आपल्या कर्मचाऱ्यांसह कोसमतोंडी सहवनक्षेत्रात गस्त घालत होते. यावेळी ते शासकीय वाहन क्रमांक एमएच-३५/के-४७०७ मधून गोंगले बीटमधील कंपार्टमेंट क्रमांक १३३५ परिसरात पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, रेंगेपार नाल्याजवळनंबर प्लेट नसलेला लाल रंगाचा ट्रॅक्टर दिसून आला.

त्या ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या वाळू भरलेली होती. ट्रॅक्टरवर चालक पवन कापगते (२५), विजय भिकारू टेंभुरकर (५०) आणि पंकज विजय टेंभुरकर (२६) हेहोते. वनकर्मचाऱ्यांना पाहताच आरोपींनी ट्रॅक्टरमधील वाळू खाली टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. वनकर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने ट्रॅक्टर जबरदस्तीने शेताच्या दिशेने नेला. वनकर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला असता ट्रॅक्टर मालीजुंगा गावातील विजय टेंभुरकर यांच्या घराजवळ थांबवण्यात आला.

यानंतर वन अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर वनविभागाच्या कार्यालयात आणण्यास सांगितले. मात्र आरोपींनी नकार देत गोंधळ घातला. या वेळी विजय टेंभुरकर व त्यांची पत्नी सैला टेंभुरकर यांनी वनकर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने यांचा शर्टचा कॉलर पकडून धक्काबुक्की केली व मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

त्याचबरोबर मोबाईल फोन हिसकावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. घटनेच्यावेळी वनक्षेत्र सहाय्यक फूलचंद शेंडे, वनरक्षक आनंद गवाले, वनमजूर चुडामन पुस्तोडे आणि शामकुवर गौरी हे उपस्थित होते. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध डुग्गीपार पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

“गस्तीवर असताना आरोपींकडून ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैध वाहतूककेली जात होती. यावेळी त्यांना ट्रॅक्टर थांबविण्यासाठी सांगितलेअसता. ट्रॅक्टर घेवून पसार झाले. त्यांचा पाठलाग करून त्यांना मालेजुंगा येथेआरोपीच्या घरी ट्रॅक्टरसह पकडले. यावेळी आरोपी व त्याच्या पत्नीने हल्लाकरून शासकीय वाहनाच्या पुढे येत अडथळा निर्माण केला. याप्रकरणी डुग्गीपारपोलिसात तक्रार नोंदवली असून आरोपींच्या विरोधात वन विभागांतर्गतही गुन्हानोंद केला आहे.”

-• मिथुन तरोणे

वनपरिक्षेत्र अधिकारी, सडक अर्जुनी

error: Content is protected !!