Friday, March 13, 2026
सड़क अर्जुनी

तालुका काँग्रेस कमेटी सडक अर्जुनी द्वारे सिलेंडर गॅस दरवाढी विरोधात निवेदन

MKM NEWS 24 – डॉ. सुशिल लाडे 
सडक अर्जुनी- १२ मार्च २०२६: – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत ६० रुपयांची वाढ केल्याच्या निषेधार्थ सडक अर्जुनी काँग्रेस कमिटीने तीव्र आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेवर, विशेषतः ग्रामीण भागातील कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडला आहे. घरगुती गॅस सिलिंडर 60 रुपये भाववाढ करण्यात आली. तसेच व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीतही ११५ रुपयांपर्यंत वाढ झाल्याने हॉटेल्स, छोटे व्यवसाय आणि सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सडक अर्जुनी काँग्रेस कमिटीच्या वतीने आज तालुक्याचे तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात  प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या ६० रुपयांच्या दरवाढीची तात्काळ माघार घ्यावी. हॉटेल रेस्टॉरंट, इतर कामगार ,विद्यार्थी , हॉस्टेल, यांचे जेवणाला फटका बसत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. शहरात आणि ग्रामीण भागात गॅस सिलिंडर चा तुटवडा जाणवत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला पुरवठा नियमित सुरू करण्यात यावे, तसेच कॅटरस व्यावसायिक रेस्टॉरंटला बंद केलेल्या पुरवठा नियमित करण्यात यावे करिता तहशीलदार मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना काँग्रेस तालुका अध्यक्ष मधुसूदन दोनोडे, गोंदिया मध्यवर्ती बँकेचे संचालक गंगाधर परशुरामकर ज्येष्ठ नेते, अनिल मेश्राम, दामोदर नेवारे, अर्जुन घरोटे, हेमराज मेंढे,स्वप्नील ब्राह्मणकर, संतोष लाडे, वीरू गौर, गायत्री ताई इरले,पुष्पा खोटेले, शिल्पा चांदेवार आणि इतर काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

निवेदनाच्या अनुसार सर्वसामान्यांना सहज गॅस उपलब्ध करून द्यावा. केंद्र सरकारने इंधन आणि गॅस पुरवठ्याचे योग्य नियोजन करावे, जेणेकरून महागाई आणि तुटवड्याचा फटका जनतेला बसणार नाही.

सडक अर्जुनी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी म्हणाले, “केंद्र सरकार ‘अच्छे दिन’ चे ढोल पिटत असताना प्रत्यक्षात जनतेच्या स्वयंपाकघरावर हल्ला चालवला जात आहे. गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना चूल पेटवणेही अवघड झाले आहे. ही अन्यायकारक दरवाढ तात्काळ मागे घेतली जावी, अन्यथा राज्यभरात काँग्रेसचे आंदोलन तीव्र होईल.” विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी मध्ये इंधन दरवाढ विरोध विषयी मोठा प्रतिसाद मिळाला आहे. काँग्रेस कार्यकर्ते जनतेसोबत उभे राहून केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध करत आहेत.
या निवेदनाद्वारे सडक अर्जुनी काँग्रेस कमिटीने केंद्र सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की, जनतेच्या समस्या सोडवल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काँग्रेस नेहमीच लढत राहील अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.

error: Content is protected !!